शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अंगणगावचा बोटिंग क्लब चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:16 IST

येवला : संतोष जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त सोमवारी अंगणगाव येथील बोटिंग क्लब परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या परिसरात पंधरा दिवसांपूर्वी तणनाशक फवारणी केल्यानंतर सोमवारी सुमारे तीन ट्रॅक्टरभर कचरा, गवत, काटेरी झुडपे व इतर घाण काढण्यात आली. यामुळे बोटिंग क्लब परिसर चकाचक होऊन त्याला पुनर्वैभव मिळाले आहे.

येवला : संतोष जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त सोमवारी अंगणगाव येथील बोटिंग क्लब परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या परिसरात पंधरा दिवसांपूर्वी तणनाशक फवारणी केल्यानंतर सोमवारी सुमारे तीन ट्रॅक्टरभर कचरा, गवत, काटेरी झुडपे व इतर घाण काढण्यात आली. यामुळे बोटिंग क्लब परिसर चकाचक होऊन त्याला पुनर्वैभव मिळाले आहे.शहरालगतच्या अंगणगाव येथील सुंदर तळ्याला सुशोभित करून फिरण्यासाठी ट्रॅक करण्यात आला आहे. शहरातील नागरिक सकाळ-संध्याकाळ फिरायला जातात. मात्र बोटिंग क्लब परिसरात तलावाभोवताली मोठ-मोठ्या बाभळींचे साम्राज्य होऊन गवताने घेरले आहे. बोटिंग क्लबच्या परिसरात सुमारे ८०० मीटरचा पायी चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला असून, या ट्रॅकच्या कडेला पावसामुळे प्रचंड प्रमाणात काटेरी झुडपे, काट्या, गवत वाढल्याने फिरायला जाणाºया-येणाºया नागरिकांना अडथळा येत असून, बोटिंग क्लबचे देखणेपणही यामुळे हरवले आहे.यामुळे पंधरा दिवसांपूर्वी संपूर्ण परिसरात स्वखर्चाने राउंडअप या तणनाशकाची फवारणी केल्यानंतर संतोष जनसेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष कुणाल दराडे यांच्या पुढाकारातून विशेष स्वच्छता मोहीम राबवली. सुमारे सत्तर स्वयंसेवकांच्या सोबत दराडे यांनी सकाळी ८ वाजता येथील स्वच्छता मोहीम हाती घेतली.संपूर्ण ट्रॅकवर उगवलेले गवत, काटेरी झाडे-झुडपे काढण्यात येऊन सुमारे दोन ट्रॅक्टर भरेल इतका कचरा इतरत्र नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. विशेष म्हणजे, इतकाच कचरा जागेवरच जमा करून जाळण्यात आला. झाडाझुडपांची कटिंगदेखील करण्यात येऊन त्याला सौंदर्य मिळवून देण्यात आले.

झाडाझुडपात आढळल्या मद्याच्या बाटल्याच्या ठिकाणी नागरिक फिरण्याच्या नावाखाली येऊन सायंकाळी मद्य सेवन करण्यासाठीदेखील येऊन बसत असल्याने या झाडाझुडपातून मद्याच्या बाटल्यादेखील स्वयंसेवकांनी जमा केल्या. सुमारे दोन ते अडीच तास ही मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण बोटिंग क्लब व त्यावरील ट्रॅक चकाचक दिसून येत होता.