शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळातही बॉश कंपनीत वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 23:05 IST

सातपूर : कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून, कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले असताना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाल्याची सुखद घटना रविवारी घडली. कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे, तर २३० हंगामी कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक करार झाल्याची माहिती बॉश युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकरार : २३० हंगामी कामगारांना करणार कायम

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून, कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले असताना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाल्याची सुखद घटना रविवारी घडली. कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे, तर २३० हंगामी कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक करार झाल्याची माहिती बॉश युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.गेल्या ४० महिन्यांपासून हा करार प्रलंबित होता. दीड महिन्यांपूर्वी नवीन युनियन पदाधिकाऱ्यांनी कराराची बोलणी पुढे चालू ठेवत रविवारी (दि.३) उभयपक्षांनी अंतिम करारावर स्वाक्षºया केल्या. या करारानुसार साडेसात हजार रुपये वेतनवाढ आणि सात टक्के उत्पादन वाढ दिल्यानंतर अडीच हजार (व्हेरिएबल बास्केट) असे दहा हजार रुपये दरमहा कामगारांना मिळणार आहेत. त्यासोबतच सीपीआय डी लिंकिंगचे तीन हजार रुपये वेगळे मिळणार आहेत. दि.१ जानेवरी २०१७ रोजी हजेरी पटावर असलेल्या सर्व कायम कामगारांना ही वेतनवाढ मिळणार आहे. दि.३ मेपासून १३० हंगामी कामगार कायम होणार असून, पुढील सहा महिन्यांत उर्वरित शंभर हंगामी कामगार कायम होतील. या करारावर कंपनीचे उपाध्यक्ष अनंतरामन, उपाध्यक्ष मुकुंद भट, मनुष्यबळ महाव्यवस्थापक श्रीकांत चव्हाण, तसेच सतीश कुमार, जतीन सुळे, तमाल सेन, शरद गिते यांच्यासह युनियनकडून अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी, उपाध्यक्ष भाऊसाहेब बोराडे, नितीन बिडवाई, सहचिटणीस हरिभाऊ नाठे, विनायक येवला, खजिनदार नंदू अहिरेआदिंनी स्वाक्षºया केल्या.व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करून केवळ पैसे न पाहता भविष्यकाळाचा विचार केला. नाशिकच्या कारखान्यात नवीन गुंतवणूक करण्याचे आश्वासन वरिष्ठ व्यवस्थापनाने दिले आहे. कामगारांना ४० महिन्यांचा फरक मिळणार आहे. करारामुळे कामगारांमध्ये विश्वासाचे आणि दिलासादायक वातावरण निर्माण होणार आहे.-अरुण भालेराव,अध्यक्ष, बॉश कामगार संघटना

टॅग्स :NashikनाशिकMIDCएमआयडीसी