शहरं
Join us  
Trending Stories
1
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
2
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
3
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
4
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
5
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
6
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
7
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
10
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
11
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
12
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
13
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
14
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
15
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
16
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
17
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
18
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
19
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
20
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश

आर्थिक मंदीमुळे ‘बॉश’ कंपनी आठ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 01:32 IST

दिवसेंदिवस वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट होत असल्याने वाहन उद्योग मंदीच्या गर्तेत सापडला आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात सहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते.

सातपूर : दिवसेंदिवस वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट होत असल्याने वाहन उद्योग मंदीच्या गर्तेत सापडला आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात सहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. आता या म्ािहन्यातदेखील सोमवारपासून आठ दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले असून, त्यामुळे महिंद्रासारख्या मोठ्या उद्योगांवर आधारित लघुउद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.आर्थिक मंदीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून वाहनउद्योग संकटात सापडला असून, कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रखरतेने जाणवायला सुरु वात झाली आहे. वाहनांची मागणी अचानक घटल्याने वाहन उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाहन उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघु उद्योगांनाही त्याचा फटका बसला आहे.वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट झाल्याने नाशिकमधील महिंद्रा आणि बॉश कंपनीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. गेल्या महिन्यात सहा दिवस बॉश कंपनीचे कामकाज बंद होते आणि चालू महिन्यात आठ दिवस उत्पादन बंद ठेवण्यात आले आहे. त्याचा परिणाम वेंडर असलेल्या लघुउद्योगांवर झाला आहे. लघुउद्योगांनी सरळसरळ कामगार कपात सुरू केली आहे. कामगार कपातीमुळे कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. उद्योग क्षेत्रावर सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.विशेष म्हणजे या आर्थिक मंदीतून बाहेर निघण्यासाठी अद्याप कोणत्याही प्रकारे केंद्र आणि राज्याकडून मंथन होत नसल्याने विशेषत: वाहन उद्योगामध्ये चिंता निर्माण झाली आहे. वाहन उद्योगा सारख्या मोठ्या उद्योगाबरोबरच त्यावर अंवलबून असलेले अन्य घटकही अडचणीत आले आहेत.नाशिकच्या कारखान्यातील काही उत्पादन थांबवण्यात आले असून, ते नाशिक ऐवजी जयपूरच्या कारखान्यात करण्यात येत आहे. त्याबदल्यात नवीन उत्पादन होेणे अपेक्षित होते. तसेच कंपनी व्यवस्थापनाने बदलत्या परिस्थितीनुसार नवीन उत्पादन नाशिक प्लांटमध्ये आणणे आवश्यक होते. आठ दिवस उत्पादन बंद ठेवल्याने त्याचा परिणाम १३५० कायम कामगारांप्रमाणेच ९०० हंगामी कामगारांवर झाला आहे. कायम कामगारांना पगारी सुटी असली तरी ९०० हंगामी कामगार आणि जवळपास ६०० कंत्राटी कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. नाशिकमधील अन्य कारखान्यांतील कामगारांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने औद्योगिक मंदीवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.- प्रवीण पाटील, अध्यक्ष, बॉश कामगार संघटना

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाMIDCएमआयडीसी