शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्टार प्रचारकांसाठी सभास्थळांचे बुकिंग सुरू; अमित शाह, उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा

By suyog.joshi | Updated: April 2, 2024 08:52 IST

नाशिक मतदारसंघात निवडणुकीला अद्याप दोन महिने वेळ असला तरी निवडणुकीची तयारी मात्र राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांसाठी नाशिकचे गोल्फ क्लब मैदान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या मैदानाची १५ ते १८ मे रोजीची बुकिंग महापालिकेकडे संबंधित पक्षांनी नोंदवली आहे. यात १५ मे रोजी ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, १६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, १७ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि १८ मे रोजी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. 

नाशिक मतदारसंघात निवडणुकीला अद्याप दोन महिने वेळ असला तरी निवडणुकीची तयारी मात्र राजकीय पक्षांकडून केली जात आहे. महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांकरता विशेषत: गोल्फ क्लब मैदानाला पसंती मिळत आहे. शिवाय राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांकडून आतापासूनच या मैदानाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नेत्यांच्या जाहीर सभांकरता मैदान मिळावे यासाठी महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाकडे अर्ज सादर करण्यात आले आहे.

... तरच सभेला मिळते परवानगी !यंदाची निवडणूक बघता शहरात वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सभा व मेळाव्यांसाठी शहरातील मैदाने उपलब्ध व्हावीत म्हणून मनपाच्या जाहिरात व परवाने विभागाकडून ना हरकत दाखला दिला जातो. या दाखल्यानंतर संबंधित विभागाकडून प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे परवानगीसाठी सादर केला जातो. त्यानंतर सभेला परवानगी दिली जाते, अशी माहिती मनपाच्या जाहिरात व परवाने विभागाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४