नाशिक : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याची, तसेच महागाई भत्ताही दिला असल्याने त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस व पाच वर्षांपासूनच्या थकीत महागाई भत्त्याची रक्कम द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.केंद्र सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांना जुलै २०१५ पासून १९ टक्के दराने महागाई भत्ता, तसेच दिवाळीपूर्वी बोनस देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकार वर्षातून दोनवेळा महागाई भत्त्यात वाढ करते, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही वाढ दिली पाहिजे; परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून लागू करण्यात आलेल्या महागाई भत्त्याची थकबाकी अद्याप शासनाने दिलेली नाही. जानेवारीत केलेल्या वाढीचीही रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने दिवाळीपूर्वी बोनस, तसेच सुधारित दराने महागाई भत्ता द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मालपुरे, रूपाली मांडे, पुष्पा मिस्तरी, ज्ञानेश्वर जोशी, गोविंद चिंचोरे, सोमनाथ विदे आदिंनी केली आहे. (प्रतिनिधी)
शासकीय कर्मचाऱ्यांना बोनसचे वेध
By admin | Updated: October 11, 2015 21:47 IST