शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारहून निघालेला बिºहाड मोर्चा पोहोचला ठेंगोड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:08 IST

सटाणा : गेल्या पंधरा वर्षांपासून आदिवासी विकास विभागाचा शासकीय आश्रम शाळांमध्ये अनेक पदावर रोजंदारीवर कर्मचारी भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन सरकारने दिले मात्र त्यांना अजून ही सेवेत समाविष्ट केलेले नाही. या कर्मचाºयांना मागील आठ महिन्याचे मानधन दिले गेले नसल्याने आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी या कर्मचाºयांनी नंदूरबार ते नाशिक बिºहाड मोर्चा काढण्यात येत आहे. सोमवारी या मोर्चाचे देवळा तालुक्यातील ठेंगोडा येथे आगमन झाले.

सटाणा : गेल्या पंधरा वर्षांपासून आदिवासी विकास विभागाचा शासकीय आश्रम शाळांमध्ये अनेक पदावर रोजंदारीवर कर्मचारी भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन सरकारने दिले मात्र त्यांना अजून ही सेवेत समाविष्ट केलेले नाही. या कर्मचाºयांना मागील आठ महिन्याचे मानधन दिले गेले नसल्याने आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी या कर्मचाºयांनी नंदूरबार ते नाशिक बिºहाड मोर्चा काढण्यात येत आहे. सोमवारी या मोर्चाचे देवळा तालुक्यातील ठेंगोडा येथे आगमन झाले. हे दोन हजार कर्मचारी पायी आदिवासी विकास आयुक्तालय येथे सामूहिक आत्मदहन करण्यासाठी जात आहेत. या मोर्चात गर्भवती महिला, लहान बालकांचा देखील समावेश आहे. महिला कर्मचाºयांची संख्या देखील मोठी आहे.या मोर्चामुळे सटाणा शहरात वाहतूक कोलमडली असून आज दुपारपासून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उन्हात प्रलंबित मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आरपारची लढाई करण्यासाठी शासकीय आश्रम शाळामधील गेल्या सहा दिवसांपासून रोजंदारी कर्मचाºयांचा बिºहाड मोर्चा निघाला आहे. नंदूरबार ते नाशिक पायी चालत जात ते सरकारला जाब विचारणार आहेत. सरकारने अनेक वेळा लेखी आश्वासन दिले. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यावरही आदिवासी विकास विभाग आपल्यावर अन्याय करीत असल्याचा भावना या आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत.दरम्यान सोमवारी सकाळी ताहाराबाद येथे आदिवासी विकासच्या प्रकल्प अधिकार्यांनी मोर्चेकर्यांची भेट घेऊन मोर्चा मागे घेण्याची विनंती केली मात्र त्यांनी ती धुडकावून लावली. आदिवासी विकास विभागातील या रोजंदारी कर्मचार्यांना गेल्या आठ महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. अनेक वेळा आंदोलन केले, आश्वासन मिळाले मात्र पदरी काही पडले नाही. यातील अनेक कर्मचार्यांची वयोमर्यादाही संपली आहे. त्यांना आता दुसरीकडे कुठे नोकरी ही करता येणार नाही. एका तपापेक्षा अधिक काळ हा संघर्ष सुरु आहे. सरकार मात्र दुर्लक्ष करीत आहे. आदिवासी लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाहीत, अशी खंत कर्मचारी व्यक्त करत आहेत. ज्या वेळेस शासकीय आश्रमशाळामधील रिक्त पदाची समस्या भीषण होती तेव्हा सरकारने याच रोजदारी कर्मचार्याच्या मदतीने वेळ मारून नेली होती. मात्र या कर्मचार्यांना न्याय देण्यापेक्षा सरकार नवीन भरती करण्याचा प्रयत्न करीत आहे. या कर्मचार्याबाबत काम सरो आण िवैद्य मरो अशी भूमिका सरकारची दिसून येत आहे. आंदोलक महिलांच्या पायाला जखमा झाल्या आहेत. अनेक आंदोलकांची प्रकृती खराब झाल्याने रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक