शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोलावा विठ्ठल...पहावा विठ्ठल...

By admin | Updated: January 23, 2017 00:24 IST

बहारदार मैफल : सद्गुरू नारायण भजन महोत्सवामध्ये श्रोते मंत्रमुग्ध

नाशिक : बोलावा विठ्ठल..., पहावा विठ्ठल..., देवा माझे मन लागे तुझे चरणी..., भेटी लागी जीवा, लागलीस आस..., यांसारख्या एकापेक्षा एक सरस अभंग, भजनांच्या सुरेल गायन व वाद्यवृंदांनी केलेल्या उत्तम साथसंगतीने मैफल उत्तरोत्तर रंगलेल्या भजन संध्येत उपस्थित श्रोते भक्तिरसात न्हाऊन निघाले.  सदगुरू नारायण सांस्कृतिक अधिष्ठानच्या वतीने परशुराम सायखेडकर सभागृहात ‘भजन महोत्सव’ मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्थतज्ज्ञ व श्रीगुरूजी रुग्णालयाचे अध्यक्ष विनायक गोविलकर उपस्थित होते. गोविलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मैफलीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अधिष्ठानचे अध्यक्ष श्रीकृष्ण चंद्रात्रे उपस्थित होते.  प्रारंभी कनकलता नृत्यालयच्या वतीने गुरूवंदना सादर करण्यात आली. ‘नृत्यशारदा’च्या विद्यार्थिनींनी श्लोक व हरिचिया भक्ता नाही भयचिंता या अभंगावर भरतनाट्यम्चा नृत्याविष्कार सादर केला. अधिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरीचा जागर व भगवान श्रीकृष्णाची कव्वाली सादर केली. सरस्वती संगीत विद्यालयाच्या एकूण १७ गायक महिलांच्या समूहाने बंगाली भजन सादर करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. स्वर रजनी ग्रुपने मराठी अभंग देवा माझे मन..., मुक्ताई भजनी मंडळाच्या वतीने अपूर्वा क्षीरसागर हिने बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल... हे अभंग सुरेल आवाजात सादर करुन ‘वन्स मोअर’ मिळविला. प्रेक्षकांनी वन्स मोअरची मागणी करताच क्षीरसागर हिने ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना..’ हे भजन सादर करुन उत्स्फूर्त दाद मिळविली. श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांच्या सादरीकरणाला दाद दिली. त्यानंतर रंगीलो राजस्थान महिला मंडळाने  संत कबीरदास यांची रामधून लागी, गोपाल धुन लागी ही रचना खास शैलीत सादर केली. तसेच पुष्पांजली माहेश्वरी मंडळाच्या चंद्रकला भुतडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारवाडी भजनाचे गायन केले. यांच्यासह एकूण तेरा भजनी संघांनी या महोत्सवामध्ये सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)