शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

म्हाळुंगी नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 19:00 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील म्हाळुंगी नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा शोध पाचव्या दिवशी शनिवारी सकाळी लागला. सदर युवक हा काळेवाडी येथील सावळेराम काशीनाथ मेंगाळ हा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यदेह कुजलेला असल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील म्हाळुंगी नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा शोध पाचव्या दिवशी शनिवारी सकाळी लागला. सदर युवक हा काळेवाडी येथील सावळेराम काशीनाथ मेंगाळ हा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यदेह कुजलेला असल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले.मंगळवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सदर युवक नदीपात्रात पडला होता. नदीला दुसऱ्यांदा मोठा महापूर आला होता. त्यावेळी सावळेराम काशीनाथ मेंगाळ (३५) हा काळेवाडी येथील युवक गण्याडोह बंधाºयावरून जात असताना वाहून गेला होता. ठाणगाव ग्रामस्थ व शासकीय यंत्रणेच्या वतीने बेपत्ता युवकाची शोध घेतला जात होता. संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदीचे पाणी कमी होत नसल्याने शोध घेण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. शनिवारी सकाळी म्हाळुंगी नदीला पुन्हा एकदा जोरदार पूर आला. त्यानंतर गण्याडोहापासून दोनशे मीटरच्या आसपास बाभळीच्या झाडाजवळ बेपत्ता युवकाचा मृतदेह दिसल्याने काळेवाडी येथील ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. पाच दिवसापासून पाण्यात प्रेत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिन्नर व ठाणगाव येथील वैद्यकीय अधिकारी यांना जागेवरच बोलवून शवविच्छेदन करण्यात आले. कामगार, तलाठी वाय. आर गावित यांनीही पंचनामा करून शासकीय मदत मिळविण्याची मागणी केली. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकfloodपूरdrowningपाण्यात बुडणे