शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तिसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:02 IST

त्र्यंबकेश्वर : मंगळवारी त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी येथील धबधब्याच्या डोहात बुडालेल्या तिघांपैकी एका युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. तर एक मृतदेह वैनतेय संस्थेच्या पथकाने अथक प्रयत्नातुन बुधवारी उशीरा काढण्यात आला. तर तिसरा मृतदेह गरुवारी (दि.१९) रेस्क्यु पथकाने विशेष मेहनत घेऊन पाण्याबाहेर काढला.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : रेस्क्यु पथकाच्या प्रयत्नांना यश

त्र्यंबकेश्वर : मंगळवारी त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी येथील धबधब्याच्या डोहात बुडालेल्या तिघांपैकी एका युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. तर एक मृतदेह वैनतेय संस्थेच्या पथकाने अथक प्रयत्नातुन बुधवारी उशीरा काढण्यात आला. तर तिसरा मृतदेह गरुवारी (दि.१९) रेस्क्यु पथकाने विशेष मेहनत घेऊन पाण्याबाहेर काढला.मंगळवारी तेलंगणा राज्यातील रहिवासी असलेले व सध्या औरंगाबाद सीएसएमएसएस कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी हॉस्टेल मध्ये राहणारे उप्पाला कोटी रेड्डी २० रम्मिाला पुडी रघुवंशी (२१) अनुषा गोरांतला (२१) गिरीधर आकाश (२०) कैपु व्यंकटेश्वरा रेड्डी २० हे दोघे रा. तेलंगणा काव्या लक्ष शेट्टी (२०) ता. हैद्राबाद तिघे रा. तेलंगणा हे सहाजण नाशिक येथील सुला वाईन्स येथे उतरले होते. ते मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथे आले. दर्शनादी सोपस्कार आटोपून ते परवा सायंकाळी दुगारवाडी धबधबा येथे गेले. यातील कोटी रेड्डी हा यापुर्वी दुगारवाडी येथे येऊन गेला होता. तो आपल्या मित्रांना घेऊन आला होता.मात्र यातील उप्पाला कोटी रेड्डी, अनुषा गोरांतला व रम्मिाला पुडी रघुवंशी हे धबधब्याचा व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी थांबले तर अन्य तिघा जणांनी त्यांना थांबण्यास विरोध केला, पण या तिघांनी त्यांचे ऐकले नाही. शेवटी ते आपल्या बाईकवरु न परत सुला वाईन येथे आले. तर थाबलेले तिघेजण पाण्यात उतरले.असेही समजते की अनुषाला सेल्फी काढण्याची सवय असल्याने कदाचित सेल्फीच्या नादात पाण्यात असलेल्या खडकावर ती उभी राहुन सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात खाली पाण्यात कोसळली. त्यात तिला काढण्यासाठी अथवा मदत करण्यासाठी दोघे जण पाण्यात उतरले मात्र तेही बुडाले, असा तर्क पोलीस करीत आहेत.त्यातील पाण्यावर तरंगत असलेली अनुषा गोरांतला व उप्पाला कोटी रेड्डी यांना मुधवारी वैनतेय संस्थेच्या पथकाने काढले तर गुरुवारी दुपारच्या सुमारास रम्मिाला पुडी रघुवंशी याचा मृतदेह रेस्क्यु पथकाने वर काढला. विशष म्हणजे हे स्थळ अत्यंत अवघड दुर्गम ठिकाणी आहे. पाण्यातील खडकात अडकलेला मृतदेह शोधुन वर काढणे व दरीतुन वरती सपाटीवर मृतदेह घेऊन येणे मोठे जिकीरीचे काम होते, पण वैनतेय व रेस्क्यु पथकाला मात्र यश मिळाले.दरम्यान घटनास्थळी त्र्यंबकेश्वर पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले तर अक्षरश: तळ ठोकून होते. सपोनि रामचंद्र कर्पे तहसिलदार दीपक गिरासे, निवासी नायब तहसिलदार रामकिसन राठोड, तलाठी परदेशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिक