इगतपुरी तालुक्यातील मानवेढे येथील आदिनाथ हनुमंता वीर हे २३ जुलैपासून बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या कुटुंबीयांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, त्यांचा मृतदेह अत्यंत खोल दरीत असल्याबाबत ग्रामस्थांनी इगतपुरी पोलिसांना गुरुवारी कळविले. सततचा पाऊस आणि अतिदुर्गम खोल दरी असल्याने मृतदेह काढणे अशक्य होते. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरीश चौबे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर महिंद्रा पथकाने कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कैलास ढोकणे, जयंत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक समाधान नागरे, अनिल नाठे, फायरमन अजय म्हसणे, मनोज भडांगे, मानवेढे गावातील पोलीस पाटील हरिश्चंद्र भागडे आदींसह ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. सर्वांच्या अथक प्रयत्नांनी ३०० मीटर खोल असलेल्या दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
190821\1932-img-20210819-wa0030.jpg
इगतपुरी जवळ 300 मीटर दरीतून काढला पोलिसांनी मृतदेह