नाशिक : उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील जेलरोड येथील धनराजनगर भागातील एक ६०वर्षीय वृध्दा बेपत्ता झाली होती. या महिलेची माहिती देणाऱ्यास कुटुंबियांकडून ५० हजारांचे बक्षीसदेखील जाहीर करण्यात आले होते. त्यांच्या राहत्या घरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या एका मोकळ्या भुखंडावर पोत्यात भरलेला त्या वृध्देचा मृतदेह मंगळवारी (दि.११) सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.धनराजनगरमध्ये राहणा-या मंदाकिनी वसंतराव पाटील (६०) मध्यम शरीरयष्टी सावळा रंग असलेली महिला बेपत्ता झाली आहे, ही महिला कोठे आढळून आल्यास तत्काळ संपर्क साधावा, माहिती देणा-यास ५० हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे पत्रकदेखील सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांकडून लावण्यात आले होते. दरम्यान, सर्वत्र शोध घेतला जात असतान या महिलेचा मृतदेह घराजवळच्या एका मोकळ्या भुखंडावर आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. महिलेचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून ओळख पटविणे शक्य झाले आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
बेपत्ता महिलेचा घराजवळच आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:48 IST
राहत्या घरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या एका मोकळ्या भुखंडावर पोत्यात भरलेला त्या वृध्देचा मृतदेह मंगळवारी (दि.११) सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
बेपत्ता महिलेचा घराजवळच आढळला मृतदेह
ठळक मुद्दे महिलेचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आहे