शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

तपोवन : कुजलेल्या अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 14:38 IST

शहरातील सर्व पोलीस ठाणे, ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता महिलांची माहितीची चाचपणी पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे.

ठळक मुद्देधारधार हत्याराने संशयिताने केला खूनपोलिसांना ओळख पटविणे अवघड होत आहे

नाशिक : तपोवन-टाकळी रस्त्यावर आठवडाभरापुर्वी अज्ञात संशयिताने एका युवतीच्या डोक्यावर धारधार शस्त्राने हल्ला करत ठार मारुन मृतदेह निर्जन ठिकाणी मोकळ्या मैदानात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने अद्याप युवतीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मीनारायण पुलाच्या अलीकडे गोदाकाठालगत थेट रामटेकडीच्या पायथ्याला असलेल्या निर्जन भागातील मैदानातील गवतामध्ये वय वर्षे १७ ते २५च्या आतील स्त्रीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, पोलीस निरिक्षक दत्ता पवार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाच्या शरीरावरील कपडेही फाटलेले आढळून आले. तसेच कुठल्याहीप्रकारे कोणतेही कागदपत्र आजुबाजुला आढळून आले नसल्याने तसेच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने पोलिसांना ओळख पटविणे अवघड होत आहे. शहरातील सर्व पोलीस ठाणे, ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता महिलांची माहितीची चाचपणी पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे. डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्यामुळे अनोळखी महिलेचा मृत्यु झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पवार करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनWomenमहिलाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय