चांदोरी : चितेगाव येथील श्रवण गणपत संगमनेरे (गट क्र ८३९) यांच्या शेतात मृत बिबट्याची मादी आढळल्याची घटना घडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली.निफाड तालुक्यातील चितेगाव शिवारात शेतात सोमवारी (दि.३) दुपारी एक वाजेच्या सुमारास एक बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती एका शेतकऱ्याने दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधीकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास केला असता सदर बिबट्या मादी असून ३ ते ४ दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. या शिवारात शेतकऱ्यांचा जास्त वावर नसल्याने ही घटना उशिरा निदर्शनास आली.सदर बिबट्याचा मृतदेह निफाड येथील रोपवाटिका केंद्रात आणण्यात आला. शवविच्छेदनात सदर बिबट्या मादीचे वय ७ ते ८ वर्ष असून तिचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदोरे यांनी दिली.सदर बिबट मादीचे सर्व अवयव शाबूत असल्याची खात्री करून मृतबिबट्याचे रोपवाटिका केंद्रात दफन करण्यात आले.या वेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण ,वनपाल वाघ, वनरक्षक विजय टेकणार ,वनसेवक भैया शेख आदी उपस्थित होते. (फोटो ०३ चांदोरी)
चितेगाव शिवारात बिबट मादीचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 18:22 IST
चांदोरी : चितेगाव येथील श्रवण गणपत संगमनेरे (गट क्र ८३९) यांच्या शेतात मृत बिबट्याची मादी आढळल्याची घटना घडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली.
चितेगाव शिवारात बिबट मादीचा मृतदेह आढळला
ठळक मुद्देमृतबिबट्याचे रोपवाटिका केंद्रात दफन करण्यात आले.