शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बोटी नाशिकच्या, शान ‘चेतक’ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:51 IST

येथील गंगापूर धरणालगत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ‘नेचर्स बोट क्लब’ला सहा वर्षे उलटले असून, अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या बोट क्लबची दिमाखदार वास्तू धूळखात पडून आहे. आठ कोटी ४७ लाखांचा निधी खर्च करून घेतलेल्या ४७ अत्याधुनिक बोटींपैकी दहा बोटी सारंगखेड्यातील तापी नदीच्या पात्रात धावत ‘चेतक फेस्ट’ची शान वाढविणाऱ्या ठरल्या.

नाशिक : येथील गंगापूर धरणालगत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ‘नेचर्स बोट क्लब’ला सहा वर्षे उलटले असून, अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या बोट क्लबची दिमाखदार वास्तू धूळखात पडून आहे. आठ कोटी ४७ लाखांचा निधी खर्च करून घेतलेल्या ४७ अत्याधुनिक बोटींपैकी दहा बोटी सारंगखेड्यातील तापी नदीच्या पात्रात धावत ‘चेतक फेस्ट’ची शान वाढविणाऱ्या ठरल्या.   शिककरांसाठी ‘बोट क्लब’ कधी सुरू होईल हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.पर्यटन मंत्रालयाकडून नाशिकच्या पर्यटन विकासासाठी वारंवार नुसतीच आश्वासने दिली गेली. येथील गोदाआरती, कलाग्रामचा रखडलेला प्रकल्प, भावली धरणाचा विकास, गंगापूरचे बोट क्लब असे सर्वच प्रकल्प जे पर्यटन मंत्रालयाच्या अखत्यारितीतील आहे ते सगळे रखडले आहे. ‘वेलनेस हब’ची घोेषणा झाली; मात्र त्यानंतर पुढे कुठल्याही प्रकारची हालचाल होऊ शकलेली नाही. नाशिकच्या पर्यटनाला दिवसेंदिवस खीळ बसत चालली आहे.नाशिककरांच्या तोंडाला पुसली पानेपर्यटन मंत्रालयाकडून राज्यात समतोल विकास साधला जावा जेणेकरून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील पर्यटनवृद्धी होईल, अशी अपेक्षा असताना केवळ ठराविक जिल्ह्यासाठी झुकते माप दिले जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाशिकचा बोट क्लब सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न होण्याऐवजी या बोट क्लबसाठी खरेदी केलेल्या ४७ बोटींपैकी दहा बोटी थेट नंदुरबारच्या सारंगखेड्याला हलविल्या गेल्या. तेथील ‘चेतक फेस्टिव्हल’मध्ये यंदा ‘साहसी जलक्रीडा’ पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली गेली हेदेखील तितकेच खरे आहे.कोट्यवधींचा खर्च पाण्यात जाणार का?पॅरासेलिंग, जेट स्कीस्, बनाना, पॅडल बोटींचा समावेश आहे. जेट स्कीस एकूण दहा, तर पॅरासेलिंग दोन उर्वरित बोटी बनाना व पॅडल प्रकारातील आहेत. यापैकी पॅरासेलिंग, जेट स्कीस् या बोटी अत्याधुनिक असून येथील दहा जेट स्कीस् बोटी सारंगखेड्यातील ‘चेतक फेस्टिव्हल’ची शान वाढविणाºया ठरल्या खºया मात्र नाशिकच्या बोट क्लबला मुहूर्त मिळणार का? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.४कॉँग्रेस-राष्टवादीची सत्ता असताना तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा करून बोट क्लब प्रकल्प साकारला; मात्र सत्ताबदल झाल्यानंतर या प्रकल्पाचे लोकार्पण होऊ शकले नाही हे नाशिककरांचे दुर्दैवच. यामुळे प्रकल्पावर केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात जातो की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकboat clubबोट क्लब