शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

नारपारला चालना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 12:46 IST

सटाणा:नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्या नारपार प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरु वात झाली असून दिल्लीतल्या एका मोठ्या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शासनाने या कामासाठी १४ कोटी रु पयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्याने वर्षभरात संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण होवून कसमादे परिसराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली .

सटाणा:नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्या नारपार प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरु वात झाली असून दिल्लीतल्या एका मोठ्या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शासनाने या कामासाठी १४ कोटी रु पयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्याने वर्षभरात संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण होवून कसमादे परिसराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली . बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्याला ३८.६६ दलघफू पाणी आरक्षणाला मंजुरी मिळवून आणल्याबद्दल कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी गोराणे येथे डॉ.भामरे यांचा सत्कार आयोजित केला होता.त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना त्यांनी ही माहिती दिली .ते पुढे बोलतांना म्हणाले की,आघाडी शासनाच्या काळात शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा मारून बासनात गुंडाळून ठेवलेला हरणबारी उजवा कालवा आम्ही शासकीय मापदंडात बसवून या कालव्यासाठी पाणी आरिक्षत करून आणल याची जाणीव लाभक्षेत्रातील शेतकºयांना जाणीव आहे म्हणून शेतकºयांनी माझा सत्कार ठेवला यामुळे सर्व शेतकºयांचे त्यांनी आभारही मानले.बागलाण तालुक्यातील शेतकरी प्रचंड स्वाभिमानी आहे.त्याला कुठल्याही सबिसडीची भिक नको असून त्याला केवळ शेतापर्यंत मुबलक पाणी,वीज आण िशेतमालाला रास्त भाव हवा आहे. तळवाडे-भामेर एक्स्प्रेस कालवा,हरणबारी डावा कालवा,केळझर चारी क्र मांक आठ ,केळझर डावा कालवा आणि हरणबारी उजवा कालव्याला मान्यता मिळविली असल्याचे त्यांनी सांगितले.बजोटे येथील पाणी परिषदेत हरणबारी उजव्या कालव्यासाठी ३८.६६ दलघफू पाणी आरिक्षत करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले होते ते आपण पाळले. चारु दत्त खैरनार यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले.तर नीलिमा देसले,तेजस देसले, आर.डी.देसले, कृती समितीचे अध्यक्ष किशोर ह्याळीज,उपाध्यक्ष डॉ.दिनेश देसले,केशव भदाणे,जिल्हा परिषद सभापती यतींद्र पाटील,डॉ.शेषराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.----------------------------गुजरात सरकारशी समजोता करारगेल्या चाळीस वर्षांपासून नार-पार बाबत आपण ऐकून आहोत.मी मंत्री झाल्यानंतर जेंव्हा देशाच्या जलआयोगाच्या अध्यक्षांना भेटलो तेंव्हा त्यांनी मला नार-पार कडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.आगामी एक वर्षांच्या कार्यकाळात गुजरात सरकारशी समजोता करार होणार असून २०१० साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नार-पार बाबत जो करार केला होता त्याच्या दीड पट अधिक पाणी आपल्याला मिळणार असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितले.या कामाचं सर्वेक्षण सुरु असून १४ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.लवकरच या माध्यमातून कसमादे सुजलाम सुफलाम होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक