शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरच्या भैरवनाथ नागरी पतसंस्थेवर प्रशासक मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:52 IST

सिन्नर : येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक रद्द करण्यात आली असून, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंध गौतम बलसाने यांनी नव्या त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. लेखापरीक्षक एस. टी. शिंदे अध्यक्ष तर विमल वस्र भांडारचे संचालक संजय चोथवे व नायगाव येथील गोदा युनियन संस्थेचे चेअरमन लक्ष्मण सांगळे सदस्य म्हणून या प्रशासक मंडळाचा कारभार पाहणार आहेत.

ठळक मुद्देद्विसदस्यीय मंडळाला कर्जवसुली व ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत गांभीर्याने घेण्याच्या सूचना

सिन्नर : येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक रद्द करण्यात आली असून, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंध गौतम बलसाने यांनी नव्या त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. लेखापरीक्षक एस. टी. शिंदे अध्यक्ष तर विमल वस्र भांडारचे संचालक संजय चोथवे व नायगाव येथील गोदा युनियन संस्थेचे चेअरमन लक्ष्मण सांगळे सदस्य म्हणून या प्रशासक मंडळाचा कारभार पाहणार आहेत.पतसंस्थेच्या प्रशाकीय इमारतीत सिन्नरचे सहाय्यक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांनी गुरुवारी (दि. २) त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाकडे पदभार सोपवला. पतसंस्थेवर रुद्राक्ष यांच्यासह नाशिकच्या सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांचे द्विसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त होते. तथापि, आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे ठेवी मिळत नाहीत, तसेच थकबाकीदार कर्जदारांकडून कर्जवसुली केली जात नसल्याच्या तक्रारी सभासदांकडून वारंवार केल्या जात होत्या. त्यामुळे आमदार कोकाटे यांनी लक्ष पुरवून विभागीय सहनिबंधक यांच्या दालनात विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत विभागीय सहनिबंधकांनी द्विसदस्यीय मंडळाला कर्जवसुली व ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या होत्या.मात्र, त्यात कोणतीही कार्यवाही न झाल्याने रुद्राक्ष व सौंदाणे यांच्या द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक रद्द करण्यात आली. आमदार कोकाटे यांच्या सूचनेनुसार नव्याने त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे.यावेळी नाशिक जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन दिलीप कातकाडे, नायगाव येथील सूर्योधन पतसंस्थेचे चेअरमन मोहन कातकाडे, संचालक रामनाथ बोडके आदी उपस्थित होते. पतसंस्थेला ऊर्जितावस्थाथकबाकी असलेल्या कर्जाची वसुली करणे व ठेवीदारांच्या ठेवी विनासायास परत करणे तसेच पतसंस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नूतन प्रशासक मंडळाच्या वतीने सदस्य संजय चोथवे व लक्ष्मण सांगळे यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकारbusinessव्यवसाय