शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर बाजार समितीच्या संचालक मंडळास २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची मुदत २१ ऑगस्ट २०२० रोजी संपुष्टात आली आहे. मात्र समितीच्या संचालक मंडळास ...

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची मुदत २१ ऑगस्ट २०२० रोजी संपुष्टात आली आहे. मात्र समितीच्या संचालक मंडळास महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम १९६३ कलम १४ (३) नुसार शासनास प्राप्त अधिकाराचा वापर करून २१ ऑक्टोबर २०२० रोजीच्या आदेशान्वये सहा महिने कालावधीसाठी म्हणजेच २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. २२ जानेवारी २०२० रोजीच्या शासन आदेशान्वये राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नियत झाल्या आहेत, अशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका २४ जानेवारी २०२१ पासून पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिन्नर बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास पुढील मुदतवाढ मिळण्यासाठी प्रस्ताव पणन संचालनालयास सादर केला होता.

-----------------

कोरोना संसर्गामुळे निर्णय

कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता तसेच सध्या विषाणू संसर्ग टाळण्यासाठी राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणाऱ्या कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळास २२ फेब्रुवारी २०२१ पासून पुढील सहा महिने म्हणजेच २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कोरोनामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळास लागोपाठ दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली असून त्यामुळे तब्बल सहा वर्षे कामकाज करता येणार आहे.