शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडा तडाखा : उच्चांकी तपमान ३९.२ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:36 IST

नाशिककरांना यंदा एप्रिल महिन्यात प्रखर उन्हाचा तडाखा जाणवणार असल्याची चिन्हे आहे. एप्रिलच्या दुसऱ्याच दिवशी हंगामातील उच्चांकी ३९.२ अंशांपर्यंत कमाल तपमानाचा पारा पोहचला. गतवर्षी २ एप्रिलला अवघे ३५.३ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते.

नाशिक : नाशिककरांना यंदा एप्रिल महिन्यात प्रखर उन्हाचा तडाखा जाणवणार असल्याची चिन्हे आहे. एप्रिलच्या दुसऱ्याच दिवशी हंगामातील उच्चांकी ३९.२ अंशांपर्यंत कमाल तपमानाचा पारा पोहचला. गतवर्षी २ एप्रिलला अवघे ३५.३ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते.  मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून शहराच्या कमाल तपमानात कमालीची वाढ होत असल्याने नाशिककरांना प्रचंड प्रमाणात उष्मा जाणवत आहे. मागील तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा नाशिककर अनुभवत असून उष्णतेची लाट वाढणार असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनही सज्ज झाले आहे. शक्यतो दुपारी बारा ते पाच या वेळेत गरज असेल तर उन्हापासून बचावाच्या सर्व उपाययोजना करूनच नागरिकांनी बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच नाशिककरांना बालकांची विशेष काळजी या मौसमात घ्यावी लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तपमानाचा पारा चाळिशी पार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा उलटल्यानंतर कमाल तपमान ३९ अंशांपर्यंत पोहचले होते; मात्र यंदा दुसºयाच दिवशी कमाल तपमान ३९ अंशांच्या पुढे गेल्याने या आठवड्यात पारा चाळिशीपर्यंत पोहचण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या वर्षी १२ ते १९ एप्रिल हा आठवडा सर्वाधिक उष्ण राहिला होता. या आठवड्यात तपमान चाळिशीच्या पुढे सरकले होते आणि गेल्यावर्षी १४ एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिनी ४१.१ अंश इतका उच्चांक नोंदविला गेला होता.उकाड्याने  घामाघूमनाशिककर सध्या उन्हाच्या प्रखर झळांनी हैराण झाले आहेत. वातावरणात उष्मा वाढल्याने उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे वातानुकूलित यंत्रांचा वापरही नागरिकांकडून वाढला आहे. मात्र वातानुकूलित यंत्रांचा वाढता वापर तपमानातील उष्मा वाढविण्यासाठी हातभार लावत आहे. नागरिकांनी वाहने, घरे, कार्यालयांमध्ये गरजेपेक्षा अधिक वातानुकूलित यंत्रांचा वापर क रणे टाळणे गरजेचे आहे.

टॅग्स :Temperatureतापमान