शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आढावा बैठकीत शहरातील बीएलओंची झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:37 IST

गेल्या तीन महिन्यांपासून भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध प्रकारची मतदार याद्या अद्ययावतीकरण मोहीम राबविली जात असल्याने त्याबाबत उदासीन असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) सोमवारी तहसीलदारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत चांगलीच झाडाझडती झाली.

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध प्रकारची मतदार याद्या अद्ययावतीकरण मोहीम राबविली जात असल्याने त्याबाबत उदासीन असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) सोमवारी तहसीलदारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत चांगलीच झाडाझडती झाली. प्रकृतीची कारणे, मोकाट कुत्र्यांचा त्रास आदी कारणे दाखवून काम नाकारणाºया बीएलओंना येत्या पंधरा दिवसांत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्याबरोबरच कारवाईचा इशाराही देण्यात आला.  मध्य मतदारसंघातील बीएलओंशी यावेळी व्यक्तिगत माहिती जाणून घेण्यात आली. त्यासाठी बीएलओंना केंद्र क्रमांकानुसार एकाच वेळी न बोलविता, टप्प्याटप्प्यात बैठकीसाठी पाचारण करून प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेताना रंगीत छायाचित्रे किती जमा केली. नवीन मतदार किती नोंदविले, मयत व दुबार मतदारांची किती नावे वगळली याची पुराव्यानिशी माहिती घेण्यात आली. त्यात अनेक बीएलओंनी शून्य टक्के काम केल्याचे यावेळी उघडकीस आल्यावर त्याबाबत जाब विचारला असता, बीएलओंकडून विविध कारणे पुढे करण्यात आली. काहींनी प्रकृती बरी नसल्याचे सांगितले तर काहींनी शाळेतून वेळच मिळत नसल्याची तक्रार केली. मतदारांच्या घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्यासाठी मतदारांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे व घरांचे दरवाजे उघडत नसल्याचे कारणही अनेकांनी दिले. लहान मुले असल्यामुळे जाता येत नाही, विशिष्ट भागात मोकाट कुत्रे अधिक  असल्याने त्यांच्या त्रासामुळे काम करता आले नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी काही बीएलओंनी पुरेसे मानधनच मिळाले नसल्याची तक्रारही केली.  तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी याबाबत तक्रारी जाणून घेत त्यावर उताराही सांगितल्यामुळे अनेक बीएलओंना माना खाली घालाव्या लागल्या. यावेळी प्रत्येक बीएलओंना त्यांनी करावयाच्या कामकाजाचा तक्ताच तयार करून देण्यात आला व येत्या ३० सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिवसभर चाललेल्या या बैठकीसाठी सर्वच बीएलओंनी हजेरी लावली.२० टक्के बीएलओंना नोटिसारविवारी मतदार पुनरीक्षण संदर्भात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. बीएलओंनी मतदान केंद्रावर दिवसभर उपस्थित राहणे अनिवार्य असताना तहसीलदारांनी केलेल्या पाहणीत नाशिक मध्य मतदारसंघातील जवळपास २० टक्के बीएलओ यावेळी गैरहजर असल्याचे आढळून आले. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय