शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

हृदयी वसंत फुलताना..

By admin | Updated: February 13, 2016 23:57 IST

आज प्रेमदिन : स्रेहाची वीण घट्ट करणार

नाशिक : व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेमाच्या उत्सवासाठी गुलाबाची फुले, आकर्षक स्वादातले चॉकलेट, कॅडबरीसह गोड पदार्थ, ग्रिटिंग्ज, भेटवस्तू, हॉटेल्स, पर्यटनस्थळे आदि साऱ्यांची सज्जता झाली आहे. पारंपरिकतेने व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशनला होणारा विरोध लक्षात घेता प्रेमीजनांनी आपल्या प्रियजनांसाठी शुभेच्छापत्र, भेटवस्तू आठवडाभरापूर्वीच खरेदी करून ठेवण्यावर भर दिलेला होता. प्रेमदिनासाठी शहरातील बाजारपेठा विविध भेटवस्तूंनी फुलल्या असून गावठी गुलाब, गॅलिटर, टाटा गुलाब, फर्स्ट रेड, मिक्स गुलाब यांसह देशी-विदेशी गुलाबपुष्प आदि फुले बाजारात दाखल झाली आहेत. चॉकलेट्सचे नवीन प्रकार, टेडी बिअर, विविध आकर्षक भेटवस्तू दुकानांमध्ये सजल्या आहेत. अगदी १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत मराठी व इंग्रजी शुभेच्छा पत्रे, २० ते ५०० रुपयांपर्यंतची विविध प्रकारची चॉकलेट्स दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय मिठाईच्या दुकानांमध्ये चॉकलेट केक, पेस्ट्री यांचेही असंख्य प्रकार तयार करण्यात येत आहेत. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या आवडत्या प्रकारातल्या केक्सची आगाऊ आॅर्डर दिली आहे. लाल, गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जात असल्यामुळे भेटवस्तूंची दुकाने लाल-गुलाबी रंगात न्हाऊन निघाली आहेत. विविध वस्तूही लाल-गुलाबी रंगांच्या आकर्षक वेष्टनात मिळत आहेत. व्हॅलेंटाइन डेला प्रेमीयुगुल शहरातील पर्यटनस्थळे, उद्याने येथील एकांताच्या ठिकाणी भेटणार असल्याने अशा ठिकाणी पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सध्या बाजारात चायना हार्टदेखील आले आहे. म्हणजे हार्ट शेपमध्ये किचेन, गॉग्लस, टोप्या, मग अशा विविध वस्तूंचा यात समावेश आहे. व्हॅलेंटाइनचा फिवर सध्या बाजारपेठेत सगळीकडेच पहायला मिळतो आहे. उशांचे कुशन्स, मग, लेटेस्ट फॅशनचे कपडे, मिठाया, खेळणी आदिंवर प्रेमप्रतीकांचा ठसा पहायला मिळत आहे. आपल्या प्रियजनांना प्रेमाची भेटवस्तू देण्यासाठी त्याची आगाऊ खरेदी करण्यावर बाजारपेठेत भर होताच पण हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी विविध हॉटेल्स, रिसॉर्ट, पर्यटनस्थळे, सिनेमागृहे आदि ठिकाणच्या पिकनिकचे प्लॅन आणि त्यासाठी गाडी, खाद्यपदार्थांची सिद्धता आदिंचे नियोजन करण्यात आले आहे. एकूणच व्हॅलेंटाइन डे व रविवार असा दुग्धशर्करा योग सत्कारणी लावण्यासाठी जोरदार तयारी झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले. (प्रतिनिधी)