शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘डीजे लेझर शो’मुळे डोळ्यांत रक्त! मिरवणुकीनंतर तरुणांच्या नेत्रपटलावर भाजल्यासारख्या जखमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 08:07 IST

शहरात डीजे आणि लेझर शोच्या गजरात उत्साही युवकांनी नाचत, थिरकत बाप्पाला निरोप दिला.

नाशिक : शहरात डीजे आणि लेझर शोच्या गजरात उत्साही युवकांनी नाचत, थिरकत बाप्पाला निरोप दिला. मात्र, दुसऱ्या दिवसापासूनच अनेक नेत्रतज्ज्ञांकडे नेत्ररुग्ण वाढू लागले. विशीतले तरुण अचानक वाढले. प्राथमिक तपासणीत त्यांची नजर खूपच कमी झाल्याचे दिसून आले. नेत्रपटलावर खूप रक्त साचून भाजल्यासारख्या जखमा आढळल्याच्या अनेक घटना नेत्ररोग तज्ज्ञांच्या निदर्शनास आल्या आहेत.

डॉक्टरांकडे तक्रारी घेऊन आलेल्या अनेकांनी मिरवणुकीत नाचत डीजेवर लेझर शो बघितल्याचे सांगितले. लेझर शोचा लेझर बर्न रेटिनावर असल्याचे बहुतांश घटनांमध्ये निदान झाले.

भविष्यात लेझर त्वरित थांबविण्याची मागणी

ग्रीन लेझरची फ्रिक्वेन्सी खूप जास्त होती. जे युवक त्या लेझरच्या फ्रिक्वेन्सीच्या फोकल लेंग्थवर आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले, त्यांच्याबाबतच हा प्रकार घडला. लहानपणी भिंग घेऊन ज्याप्रमाणे उन्हात कागद पेटवायचो तसाच प्रकार या लेझर बर्नने तरुणाईच्या डोळ्यांवर केला होता.

विसर्जनासाठी गेलेले तीन युवक बुडाले

सावली (जि. चंद्रपूर) :  सार्वजनिक युवा गणेश मंडळाच्या विसर्जनाच्या दरम्यान असोलामेंढा तलावाच्या कालव्यात तिघे जण बुडाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. बुडालेल्यांमध्ये दोन सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. निकेश हरिभाऊ गुंडावार (३१), संदीप हरिभाऊ गुंडावार (२७) व गुरुदास दिवाकर मोहुर्ले (३३) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. यातील निकेश व गुरुदास यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. निकेश व संदीप हे दोघे बंधू काही महिन्यांपूर्वी सावली शहरात आले व त्यांनी येथे रसवंतीचा व्यवसाय थाटला. व्यवसायात चांगलाच जम बसला असताना ही घटना घडली.