नाशिक : शुक्रवारी (दि.९) नाशकात सातपूरच्या ईएसडीएस कंपनीत तसेच महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे म्युनिसिपल सेनेच्या वतीने आणि लोकमतच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचे आयोजन सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत करण्यात आले आहे.
‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुरुवारी (दि.८) एकाच ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडले. गुरुवारी एबीएच डेव्हलपर्सच्या गंगापूररोेडवरील ट्री लॅन्ड प्रकल्पात झालेल्या रक्तदान शिबिरात एकूण ५५ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले आहे.
फोटो कॅप्शन (एबीएच १)
एबीएच डेव्हलपर्सच्या ट्री लॅन्ड प्रकल्पात झालेल्या रक्तदानानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करताना डॉ. पुरुषोत्तम पुरी आणि निशित अटल. समवेत अन्य रक्तदाते.
-----------
(एबीएच २)
एबीएच डेव्हलपर्सच्या ट्री लॅन्ड प्रकल्पात रुचिरा पगार यांना गौरवपत्र प्रदान करताना विजयगोपाल अटल.
--------
(एबीएच ३)
एबीएच डेव्हलपर्सच्या ट्री लॅन्ड प्रकल्पात रक्तदानानंतर प्रमाणपत्र वितरित करताना रितेश हंसवानी.
---------
(एबीएच ४)
एबीएच डेव्हलपर्सच्या ट्री लॅन्ड प्रकल्पात रक्तदान करताना प्रशांत बागमार.
--------