शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गावागावात नाकाबंदी; नागरिकांकडून दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 22:42 IST

तालुक्याला लागून असलेल्या चांदवड व मालेगाव तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्ण सापडल्यामुळे देवळा तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच चांदवड येथे सापडलेला कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेले तालुक्याच्या ग्रामीण भागातील तीन व देवळा शहरातील एकजण होम कॉरण्टाइन करण्यात आल्यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

ठळक मुद्देदेवळा तालुका : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढाकार

देवळा येथील सुभाष रोड परिसरात शहर प्रवेश-द्वाराचा मार्ग युवकांनी बंद केला आहे.देवळा : तालुक्याला लागून असलेल्या चांदवड व मालेगाव तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्ण सापडल्यामुळे देवळा तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच चांदवड येथे सापडलेला कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेले तालुक्याच्या ग्रामीण भागातील तीन व देवळा शहरातील एकजण होम कॉरण्टाइन करण्यात आल्यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील अनेक गावात युवकांनी पुढाकार घेऊन गावात प्रवेश करण्याचे मार्गावर अडथळे निर्माण करून नाकेबंदी केली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. ग्रामीण भागात काही गावांमध्ये ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन कोरोनाचा संसर्ग होण्यास संभाव्य कारण ठरणाºया गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या घटना घडल्या आहेत.कोरोनाविषयी सर्वत्र जागरूकता दिसू लागली आहे. देवळा शहरात सुभाष रोड, पंचायत समिती कार्यालय आदी भागातील शहराचे प्रवेश मार्ग बंद करण्यात आले असून, बाहेरगावाहून येणाºया नागरिकांवर पोलिसांबरोबरच शहरातील नागरिकही आता जातीने लक्ष ठेवून आहेत.

दि. १० एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत देवळा नगरपंचायत प्रशासनाने गावातील वैद्यकीय व्यवसाय, औषध विक्रीची दुकाने वगळता इतर सर्व किराणा, भाजीपाला, मांस विक्री आदींची दुकाने बंद केल्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणारे नागरिक आता बंद झाल्यामुळे शहरातील रस्ते, चौक ओस पडले आहेत.उपविभागीय अधिकारी चांदवड यांच्या आदेशान्वये तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असून, मास्कचा वापर न करणाºया नागरिकांवर साथरोग प्रतिबंधक, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आदींद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.- दत्तात्रेय शेजुळ, तहसीलदारवाहन जप्तीची कारवाईदेवळा पोलिसांनी लॉकडाउन व संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असून, शहरासह ग्रामीण भागात पोलिसांची गस्त सुरू आहे. वाहनचालकांवर दंडात्मक किंवा वाहन जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. यामुळे विनाकारण बाहेर फिरणाºया बेफिकीर नागरिकांना आळा बसला असून, कारवाईच्या भीतीमुळे हे नागरिक आता घराबाहेर पडेनासे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य