शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारावर कारवाईसाठी घंटागाडी कामगारांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:18 IST

नाशिक- नाशिकरोड येथील घंटागाडी कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठेकेदार आणि सुपरवायझरसह अन्य व्यक्तींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२६) घंटागाडी ...

नाशिक- नाशिकरोड येथील घंटागाडी कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठेकेदार आणि सुपरवायझरसह अन्य व्यक्तींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२६) घंटागाडी कामगारांनी जिल्हा शासकीय कार्यालयासमेारच रास्ता रोकाे केले. शवविच्छेदनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याची रीतसर चौकशी करण्यात येईल असे अश्वासन पेालीसांनी दिल्यानंतर संबंधीतांनी शव ताब्यात घेतले. महापालिकेच्या घंटागाडी कामगार आणि नाशिकरोड येथील ठेकेदार यांच्यात गेल्या वर्षभरापासून विविध कारणांवरून संघर्ष सुरू आहे. त्यातच नाशिकरोड येथील कामगार केशव आत्माराम कांबळे हे आजारी पडले आणि नंतर त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. मानसिक छळामुळे ते आजारी पडले आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असा त्यांच्या कुटूंबिय आणि श्रमिक सेवा संघाचा आरोप होता. गुरूवारी (दि.२५) या कामगाराचे निधन झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेतली परंतु उपयोग झाला नाही. शुक्रवारी (दि.२६) त्या मृत कामगाराचे शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आल्यानंतर कामगारांनी आधी गुन्हा दाखल करावा मगच शव ताब्यात घेण्यात येईल अशी भूमिका घेतली. महादेव खुडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार आक्रमक झाल्यानंतर अन्य विभागातील घंटागाडी कामगार देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कामगारांनी जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरच रास्ता राेको केले. यावेळी नाशिकरोड पेालीस ठाण्याचे निरीक्षक सोमवंशी यांनी मध्यस्थी केली आणि शवविच्छेदनाची प्रक्रीया पार पडल्यानंतर याेग्य ती कारवाई करण्यात येईल असे अश्वासन दिल्यानंतर शव ताब्यात घेतल्याचे खुडे यांनी सांगितले. संबंधीत कामगरावर साक्री येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.

ठेकेदार आणि सुपरवायझरच्या छळामुळे या कामगाराची प्रकृती बिघडली आणि रूग्णालयात दाखल करण्यात आले त्याचवेळी या कामगाराच्या पत्नीने पेालीसांत तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर २२ फेब्रुवारीस त्या कामगाराने देखील चार जणांची नावे पेालीसांना सांगितली होती. त्यानंतरही पोलीसांनी कारवाई न केल्याने अखेरीस आंदोलन करण्याची वेळ आल्याचे खुडे यांनी सांगितले.

===Photopath===

260221\26nsk_65_26022021_13.jpg

===Caption===

नाशिकरोड येथील घंटागाडी कामगार केशव कांबळे याच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयासमोर आंदोलन करताना अन्य कामगार