शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बीएलओ मानधन घोटाळा: सेवानिवृत्त पोलीसही लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:48 IST

मालेगाव तालुक्यात निवडणूक कामासाठी नेमलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) देण्यात येणाºया मानधन वाटपात आर्थिक घोटाळ्याची चौकशी करणा-या समितीला अनेक धक्कादायक बाबी आढळल्या

नाशिक : मालेगाव तालुक्यात निवडणूक कामासाठी नेमलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) देण्यात येणाºया मानधन वाटपात आर्थिक घोटाळ्याची चौकशी करणा-या समितीला अनेक धक्कादायक बाबी आढळल्या असून, शासकीय पातळीवरील भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याची जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील काही सेवानिवृत्त पोलीस कर्मचाºयांनाही कागदोपत्री बीएलओ दाखवून त्यांच्या नावावर पैसे लाटल्याचे उघड झाले आहे.  या साºया प्रकरणात दोषी असलेल्या एका नायब तहसीलदाराला मात्र पाठीशी  घातले जात असल्याचेही कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  गेल्या महिन्यात सर्वप्रथम ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. मालेगाव तालुक्यात निवडणूक कामासाठी पाचशेहून अधिक बीएलओंची नेमणूक करण्यात आलेली असून,त्यांच्या नावे दरवर्षी हजारो रुपयांचे मानधन बॅँक खात्यात जमा केले जात आहे.  तथापि, दरवर्षी मानधन घेणाºया बीएलओंकडून मात्र निवडणूक आयोगाचे काम केले जात नसल्याचे लक्षात  आल्यावर चौकशी केली असता, बहुतांशी बीएलओ कागदोपत्री दाखवून त्यांच्या नावे बँक खात्यात पैसे जमा करून नंतर या  रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले होते.  यासंदर्भात मालेगाव तहसील कार्यालयातील सोनवणेनामक कर्मचा-यावर गुन्हाही  दाखल करण्यात आला आहे.  मात्र या कर्मचा-याला  अद्यापही पोलिसांनी अटक केली नसल्याचे व त्यामुळे त्याचे निलंबन  रखडल्याचे बोलले जात असले तरी, या साºया घोटाळ्यात निवडणूक नायब तहसीलदाराची  महत्त्वाची भूमिका असून, त्याच्या संमतीशिवाय हा घोटाळा  होऊच शकत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र त्याला सोयीस्कर पाठीशी घालण्यात येत असून, त्याबाबत वारंवार वरिष्ठ कार्यालयाला कळवूनही नायब तहसीलदार सहीसलामत सुटल्याचे सांगितले जात आहे.  बीएलओंच्या मानधन घोटाळ्यात ज्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्या सोनवणेचे नातेवाईक, पत्नी, मित्र, मैत्रिणींना कागदोपत्री बीएलओ दाखविण्यात आले, त्याचबरोबर काही पोलीस कर्मचाºयांचीही नावे त्यात घुसडविण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय