शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धडधाकटांना केले अंध, पंगू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:27 IST

निवडणुकीत जो मतदार एका पायाने अपंग होता, त्याचे दोन्ही पाय सुरळीत होते. अंध डोळस होता तर ज्याला मनोरुग्ण ठरवले तो तर सुज्ञपणे व्यापार करणारा आढळला... लोकसभा निवडणुकीची मतदार यादी किती बोगस आहे हा त्याचा खास नमुना काही अधिकाऱ्यांना आढळला आहे.

नाशिक : निवडणुकीत जो मतदार एका पायाने अपंग होता, त्याचे दोन्ही पाय सुरळीत होते. अंध डोळस होता तर ज्याला मनोरुग्ण ठरवले तो तर सुज्ञपणे व्यापार करणारा आढळला... लोकसभा निवडणुकीची मतदार यादी किती बोगस आहे हा त्याचा खास नमुना काही अधिकाऱ्यांना आढळला आहे. त्यामुळे मतदार यादी किती निर्दोेष आहे, याची चुणूकच प्राथमिक तपासणीत मिळाली आहेत.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदार जागृती आणि मतदान करवून घेण्यावर अधिक भर दिला आहे. मतदान वाढावे यासाठी मतदारांना पाण्याची सोय तर उन्हात उभे राहण्यास लागू नये यासाठी मंडपदेखील घालण्याचे आदेश दिले आहेत. दिव्यांग मतदारांना तर घरून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी मोटारींची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विविध अधिकाऱ्यांना खास दिव्यांगाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याशी चर्चा करून घेऊन अधिकाºयांनी त्यांना आपला भ्रमणध्वनी क्रमांक द्यायचा असून मतदानासाठी गाडीची सोय करणे गरजेचे असल्यास त्यानुसार ती केली जाईल असे सांगण्यात आले. यामुळे अधिकारी संबंधित दिव्यांगांची भेटदेखील घेत आहेत. तथापि, एका अधिकाºयाकडे अठरा दिव्यांग मतदारांची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार त्याने घरभेटी दिल्यानंतर भलताच प्रकार आढळला. एका मतदाराला एक पाय नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी गेल्यानंतर मतदाराला दोन्ही पाय असल्याचे आढळले तर अंध व्यक्ती हा प्रत्यक्षात डोळस होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोरुग्ण म्हणून ज्या मतदाराची नोंद झाली तो उत्तम व्यापारी असल्याचे देखील आढळले असे अनेक ठिकाणी आढळले असून त्यामुळे मतदार यादी विषयी शंका घेतली जात आहे.मतदार यादीसाठी निवडणूक शाखेने अनेक प्रकारची काळजीघेतली आहे. विशेषत: दिव्यांग मतदारांची यादी तयार करण्यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा रुग्णालय आणि दिव्यांगासाठी काम करणाºया संस्था यांची यादी घेतली आहे. मात्र तरीही यादी इतकी सदोष असेल तर काय होणार, असादेखील प्रश्न संबंधित अधिकारी वर्ग करीत आहेत.संस्थाचालकांना भुर्दंडजिल्हा प्रशासनाने मतदानासाठी शाळा घेतल्या असून, त्या तळमजल्यावरच असाव्यात असा कटाक्ष ठेवला आहे. यातील अनेक शाळा जुन्या आहेत. परंतु केवळ मतदानासाठी त्या केंद्रांवर दिव्यांग मतदार असो किंवा नसो सर्वांना रॅम्प करण्यास सांगितले असून त्याचा संस्थाचालकांना भुर्दंड बसला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय