सायखेडा : ‘महाराष्टÑ माझा परिवार’च्या वतीने नाशिकमधील रामकुंड आणि गंगेच्या परिसरात गरम कपड्यांविना झोपणाऱ्या अनाथ लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. समाजातील वंचित घटकांसाठी महाराष्टÑ माझा परिवार काम करीत आहे. यंदा जिल्ह्यात थंडीने उच्चांक गाठला आहे. यावेळी रस्त्यावर कुडकुडणाºया लोकांना गरम कपड्यांची आणि मायेची ऊब या परिवाराने दिली. रात्री १२ वाजता परिसरात अशा माणसांचा शोध घेऊनत्यांच्या अंगावर उबदार कपडे टाकले. यावेळी विठ्ठल उगले, विकास भागवत, धोंडीराम रायते, बापू ढिकले, स्वप्नील डुंबरे, दीपक पाटील, बाजीराव कमानकर, अशोक डमाळे, प्रकाश चतूर, गणेश वाणी, वाळू जाधव, मनोज ठाकरे, शिवा काकड, गाडे, उपस्थित होते.
नाशिकच्या गंगाघाटावरील बेघरांना ब्लँकेट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:23 IST