नाशिक : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजावर अन्याय होत असून या अन्यायाविरोधात आज आदिवासी विकास भवनासमोर अखिल भारतीय विकास परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी परिषेदच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर ठिय्या मारुन जोरदार घोषणाबाजी करत प्रशासकीय कारभाराचा निषेध नोंदविला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन आयुक्तांविरोधात घोषणा देत दिनदयाळ योजनेचा धिक्कार केला.‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे‘, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणा व फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधले.