शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या निषेधार्थ भुजबळ समर्थकांचा ‘काळा दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 15:25 IST

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार छगन भुजबळ व पुतणे समीर भुजबळ हे गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात अटकेत असून, त्यांच्याविरुद्ध सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करून राज्यभरातील छगन भुजबळ समर्थकांकडून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले,

ठळक मुद्देसुडबुद्धीने कारवाई : राजकीय कारकिर्द संपविण्याचे षडयंत्र

नाशिक : डोक्यावर ‘मी भुजबळ’अशी घातलेली टोपी, हातात भुजबळ समर्थकाचा पिवळा झेंडा व राज्य सरकार मुर्दाबादच्या काळ्या कपड्यानिशी दिल्या जाणा-या घोषणांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार दणाणून गेले. निमित्त होते, राज्याचे नेते व सध्या तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना जाणून बुजून जामीन नाकारून तुरुंगात अडकवून ठेवल्याच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक समन्वय समितीने पुकारलेल्या सत्याग्रह आंदोलनाचे.जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार छगन भुजबळ व पुतणे समीर भुजबळ हे गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात अटकेत असून, त्यांच्याविरुद्ध सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करून राज्यभरातील छगन भुजबळ समर्थकांकडून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले, त्याचाच भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी दिवसभर सत्याग्रह केला. सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने भुजबळ समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडक देत, केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोेषणा बाजी केली. ‘ वी वॉन्ट जस्टीस’, ‘भुजबळ मांगे जस्टीस’, ‘भुजबळ साहेब झिंदाबाद’, ‘राज्य सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा देत समर्थकांनी रस्त्यावर धाव घेतली. त्यामुळे काहीकाळ जुना आग्रारोडवरील वाहतूक खंडित झाली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी शिष्टमंडळाने समन्वय समितीच्या वतीने तयार करण्यात आलेले मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांना सादर केले. त्यात म्हटले आहे की, महाराष्टÑाच्या राजकारणात पन्नास वर्षे वाटचाल करणारे व दलित, ओबीसी, अल्पसंख्याकांचे नेतृत्व करणारे छगन भुजबळ यांना राजकीय हेतूने प्रेरित होऊन विद्यमान सरकारकडून खोटे नाटे आरोपांवर तुरुंगात डांबण्यात आले आहे. यात कायद्याचे उल्लंघन करण्यात आले असून, भुजबळ यांनी तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करूनही निव्वळ तांत्रिक कारणे पुढे करून त्यांच्या सुटकेत अडथळे निर्माण केले जात आहेत, शिवाय काही तथाकथित लोकांना हाताशी धरून न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात असून, हा सारा प्रकार म्हणजे भुजबळ यांची राजकीय कारकिर्द संपविण्याचेच षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जनभावनेचा विचार करून छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक