शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

भाजपच्या विजयाचा जिल्ह्यात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:24 IST

जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि.२३) दुपारी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

नाशिक : जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि.२३) दुपारी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.  सकाळपासून दिंडोरी लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. चौकाचौकात कार्यकर्ते गर्दी करून थांबलेले होते, तर अनेकजण घरात दूरदर्शन संचासमोर ठाण मांडून बसलेले होते. पहिली, दुसरी आणि तिसरी फेरी झाल्यानंतर भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतल्याचे  स्पष्ट होताच तसेच संपूर्ण देशभरात भाजप उमेदवार आघाडीवर असल्याचे वृत्त समजताच  भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दुपारी निकाल घोषित होण्यापूर्वीच पेढे, लाडू वाटप करून व फटाके फोडून नमोचा  नारा लगावत आनंदोत्सव साजरा केला.एकीकडे भाजप-शिवसेना युतीचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत होते, तर दुसरीकडे काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचल्याने अनेकांनी सोशल मीडियावर विरोधकांची खिल्ली उडविणारे संदेश  प्रसारित करून बार बार भाजप सरकारचा नारा लगावला. युतीच्या उमेदवाराने मतांची आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर आनंदाचे वातावरण पसरले होते.घोटी शहरात विजयोत्सवदेशभरात भाजपने मारलेल्या विजयी मुसंडीचे इगतपुरी तालुक्यात स्वागत करण्यात आले.भाजपा तालुकाध्यक्ष अण्णा डोगरे, कैलास कस्तुरे ,शरद हांडे ,गणेश काळे ,रमेश परदेशी, बाळासाहेब सुराणा ,धर्मा अव्हाड, मयूर परदेशी आदींसह शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.निफाडला आतषबाजीएनडीएने अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर निफाडमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. देशात एनडीएने बहुमत मिळवल्याने आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार विजयी झाल्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास युतीचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात एकत्रित आले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून व नागरिकांना पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वाघ, भागवतबाबा बोरस्ते, सचिन धारराव, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय कुंदे, नगरसेवक आनंद बिवलकर, संजय धारराव, अ‍ॅड. भोई, सचिन गिते, भगवान गाजरे, अशोक कुंदे, योगेश कापसे, विलास भालेराव, सार्थक गाजरे, रतन गाजरे, राहुल कांबळे, विलास वाळके, बापू कुमावत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.मतदान झाल्यानंतर तब्बल२५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल समोर आला. टीव्हीसंचासमोर बसून भारतातील विविध मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षांची आघाडी- पिछाडी पाहून कार्यकर्ते जल्लोष करीत होते. विशेषकरून भाजपचा वाढत्या जागांवर विजय पाहून कार्यकर्ते फडाके फोडून जल्लोष करताना दिसले. निकालाचा दिवस असल्याने रहदारीने फुललेल्या डॉ. आंबेडकर चौकात शांतता होती. मेनरोडकडे जाणारा रस्त्यावरही शुकशुकाट होता. सर्व मतदार व पक्षीय कार्यकर्ते निकाल पाहण्यात दंग होते व आनंद साजरा करत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBJPभाजपाnashik-pcनाशिक