शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

भाजपाच्या विजयी वारुला मालेगावात लगाम

By admin | Updated: May 26, 2017 19:08 IST

मालेगाव : देशभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकविणाऱ्या भाजपाच्या वारुला मालेगावकरांनी महापालिकेत लगाम लावला आहे.

मालेगाव/संजय दुनबळेमालेगाव : देशभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकविणाऱ्या भाजपाच्या वारुला मालेगावकरांनी महापालिकेत लगाम लावला आहे. पक्षाची मुस्लीम कार्डची खेळी फसली असली तरी ९ जागा मिळवुन मालेगावात खाते उघडल्याचे समाधान मात्र पक्षधुरीनांना मिळाले आहे. शहराच्या पूर्व भागातुन भाजपाचा एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नसला तरी आपण मुस्लिमांनाही संधी दिल्याचे सांगण्यास पक्षनेते विसरले नाहीत. त्रिशंकु स्थितीत सर्वाधिक २८ जागा मिळवुन कॉँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले असले तरी सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या मॅजीक आकड्यासाठी मोठा सत्ता संघर्ष व तडजोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील पंचवार्षीकमध्ये तीसरा महाज व कॉँग्रेसने आघाडी करुन अडीचवर्ष महापौरपदी कॉँग्रेसच्या ताहेरा शेख यांची वर्णी लावली होती. मात्र राजकीय घडामोडी घडल्यानंतर तिसरा महाज, सेना, शहर विकास आघाडीला हाताशी धरुन माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांचे खंदे समर्थक हाजी मो. इब्राहीम यांना महापौरपदाची संधी देण्यात आली होती. या काळात विविध आरोप प्रत्यारोपामुळे महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघाले असल्यामुळे यावेळच्या निवडणुकीकडे जाणकारांचे लक्ष लागले होते. गतवेळच्या तिसरा महाजचे यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यात आले. राष्ट्रवादी कॉँग्रेसने जनता दलाशी युती केली तर राष्ट्रीय कॉँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुक रिंगणात उडी घेतली. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांनी परस्परांविरुध्द दंड थोपटले तर एमआयएमने प्रथमच आपले भवितव्य आजमाविले. निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झाली प्रचारादरम्यान परस्परांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. प्रत्येक पक्षाने विजयाचा दावा केला असला तरी मतदानाची कमी टक्केवारी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकविणारी ठरली. रखरखीत उन्हामुळे मतदानाची टक्केवारी घसरली. त्यामुळे बहुमताच्या ४३ या जादुई संख्येपर्यत एकाही पक्षाला पोहोचता आले नसले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने मालेगावात भारतीय जनता पक्षाने आणि एमआयएमने प्रत्येकी ९ आणि ७ जागा मिळवुन आपले खाते उघडले आहे.गतवेळी दोन नगरसेवक असलेल्या मनसेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला असून जनता दलाला ६ जागांच्या रुपाने काहीसा दिलासा मिळाला आहे. महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच होणार असली तरी कॉँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद यांनी महापौर पदाचे उमेदवार म्हणूनच महापालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. आपली महापौरपदाची इच्छा पुर्ण करण्यासाठी आता ते कोणती खेळी खेळतात यावरच पुढील गणिते अवलंबुन आहेत.दादा भुसे यांच्या रुपाने शिवसेनेने मालेगावला मंत्रीमंडळात स्थान दिले असले तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झालेला पराभव दादा भुसे यांच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मागील पंचवार्षीक मध्ये ११ जागांवर असलेली शिवसेना यावेळी १३ जागांवर पोहोचल्याने भुसे यांनी पराभवाचा वचपा काढला असे म्हणायला हरकत नाही.