शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी सभापतिपदासाठी भाजपाचा हट्ट; तोडगा नाही

By admin | Updated: June 19, 2014 00:56 IST

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने दावा केला असून, गेल्यावर्षी मनसेने दिलेला शब्द पाळण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने दावा केला असून, गेल्यावर्षी मनसेने दिलेला शब्द पाळण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे मंगळवारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आता हा विषय पक्षनेत्यांकडे सोपविण्यात आला आहे.महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यासाठी व्यूहरचना सुरू झाली आहे. मनसे आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी ‘रामायण’वर बैठक झाली. या बैठकीत भाजपाने सभापतिपदावर दावा सांगितला. गेल्या दोन वर्षांत मनसेला सभापतिपदासाठी भाजपाने संधी दिली होती. गेल्यावर्षी झालेल्या चर्चेनुसार आता भाजपाला ही संधी मिळणे अटळ आहे, असे या पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. तर, मनसेला पालिकेत सत्ता असूनही अनेक कामे करता आली नाहीत. स्थायी समिती असल्यावरच ती होणे शक्य असल्याने यंदा मनसेला संधी द्यावी आणि त्यानंतर पुढील वर्षी भाजपाने सभापतिपद घ्यावे, असे मत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.गेल्यावर्षी सभापतिपदाच्या निवडणुकीच्या वेळी मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच गिरीश महाजन यांच्यासह अन्य नेत्यांच्या झालेल्या बैठकीत पुढील वर्षी म्हणजेच आत्ता २०१४ मध्ये भाजपाला उमेदवारी देण्याचे ठरले असल्याचे स्मरण भाजपाने करून दिले. भाजपा जुमानत नसल्याने अखेरीस बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. दोन दिवसांनी पुन्हा चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. मनसेचे शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले. बैठकीस आमदार वसंत गिते, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, मनसेचे सभागृह नेता शशिकांत जाधव, शहराध्यक्ष राहुल ढिकले, भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, माजी अध्यक्ष विजय साने, माजी महापौर बाळासाहेब सानप, गटनेता संभाजी मोरूस्कर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)