शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात घरपट्टी दरवाढ सौम्य करण्याचे भाजपाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 20:22 IST

महापौरांकडून दिलासा : व्यापारी-उद्योजक संघटनांचे साकडे

ठळक मुद्देघरपट्टी दरात ३३ ते ८२ टक्के वाढ केल्याने विरोधी पक्षांकडून आंदोलने सुरूदरवाढ निम्म्यावर येण्याची शक्यता

नाशिक : सर्वत्र निर्माण झालेला रोष आणि विरोधी पक्षांनी सुरू केलेली आंदोलने यामुळे सत्ताधारी भाजपा अडचणीत येऊ पाहत असतानाच महापालिकेने घरपट्टीत केलेली दरवाढ सौम्य करण्याचे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी (दि.२७) व्यापारी-उद्योजक संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. महासभेत करवाढीचा निर्णय झाला असला तरी, तीनही आमदार आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करून सर्वांना परवडेल अशीच दरवाढ केली जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दरवाढ निम्म्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महापालिकेने घरपट्टी दरात ३३ ते ८२ टक्के वाढ केल्याने विरोधी पक्षांकडून आंदोलने सुरू आहेत तर भाजपा वगळता सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन त्याविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सोमवारी (दि.२६) चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यालयात व्यापारी व उद्योग संघटनांच्या पदाधिका-यांची बैठक होऊन त्यात महापौरांना भेटून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार, मंगळवारी (दि.२७) महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली उद्योग, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन महापौर रंजना भानसी यांना निवेदन दिले. यावेळी संतोष मंडलेचा यांनी सांगितले, दरवाढीला आमचा विरोध नसून ती अवाढव्य न करता माफक प्रमाणात करावी. नाशिकमध्ये अनेक कारखाने आजारी आहेत. मंदीच्या लाटेतून सावरले जात असतानाच ही कंबरतोड करवाढ अन्यायकारक आहे. मनपाने एकाच वर्षी एवढी वाढ न करता ती टप्प्याटप्प्याने वाढवावी, अशी सूचनाही मंडलेचा यांनी केली. रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया,निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड यांनीही करवाढ अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले.सर्वांना परवडेल अशीच दरवाढशिष्टमंडळाने आपले म्हणणे मांडल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी सांगितले, महासभेत करवाढीचा प्रस्ताव आला असला तरी त्याचवेळी एक समिती नेमून त्यावर निर्णय घेण्याची माझी भूमिका होती. परंतु, करवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अखेरचा दिवस असल्याने निर्णय घेणे भाग पडले. मात्र, प्रस्ताव काहीही असला तरी सर्वांना परवडेल अशीच दरवाढ केली जाईल. त्यासंदर्भात पक्षाचे तीनही आमदार व पालकमंत्री यांचेशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मी जनतेची प्रतिनिधी असल्याने जनतेसोबतच असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर