शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

पोटनिवडणुकीत भाजपाची सरशी

By admin | Updated: August 30, 2016 02:05 IST

महापालिका : मंदा ढिकले, सुनंदा मोरे विजयी; शिवसेना-मनसेला झटका

 नाशिकरोड : जेलरोड प्रभाग ३५ व ३६च्या झालेल्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मंदाबाई बबन ढिकले (१९४६) व सुनंदा लक्ष्मण मोरे (१९३७) मते मिळवून विजयी झाले. मनपाच्या निवडणुकीत जेलरोड भागात २५ वर्षात पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलले आहे.जेलरोड प्रभाग ३५ (ब) व प्रभाग ३६ (ब) पोटनिवडणूक मतदानाची मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजता दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आर. एम. बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. मतमोजणीमुळे दुर्गा उद्यान कॉर्नर ते नाशिकरोड न्यायालय या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटस् लावून वाहतूक बंद ठेवून सर्वांनाच प्रवेश नाकारला होता. प्रारंभी प्रभाग ३५ ची मतमोजणी दोन टेबलांवर घेण्यात आली. पहिल्या पाच मतदानयंत्रातील झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या वृषाली नाठे व भाजपाच्या मंदाबाई ढिकले यांच्यात थोड्याफार मतांचा फरक असल्याने ‘नेट टू नेट’ लढत चालली होती, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वंदना चाळीसगावकर यांना दोन आकडी इतकेच मतदान मिळत होते, तर मनसेच्या शांताबाई शेजवळ यांना पहिल्या चार यंत्रांच्या मतदानात दोनच आकडीचे व पाचव्या यंत्रात तीन आकडी मतदान मिळाले, तर सहाव्या मतदानयंत्रापासून दहाव्या मतदानयंत्रापर्यंत भाजपाच्या ढिकले यांनी निर्णायक आघाडी कायम ठेवली. मतमोजणीअखेर भाजपाच्या मंदाबाई ढिकले (१९४६) मते मिळवून विजयी झाल्यात, तर शिवसेनेच्या वृषाली नाठे (१७४८) मते मिळवत १९८ मतांनी पराभूत झाल्या, तर मनसेच्या शांताबाई शेजवळ यांना (९९१), राष्ट्रवादी-कॉँग्रेस आघाडीच्या वंदना चाळीसगावकर (२६७) व एकाही उमेदवाराला नाही ‘नोटा’-६९ मतदान मिळाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या चाळीसगावकर यांना एकाही यंत्रात ५० पेक्षा जास्त मतेदेखील मिळाली नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे डिपॉझिट जप्त झाले आहे. भाजपाच्या मंदाबाई ढिकले हे विजयी झाल्याचे स्पष्ट होताच मतदान केंद्राबाहेर जमलेल्या भाजपा समर्थकांनी घोषणा देत जोरदार आनंदोत्सव साजरा केला. तर पराभवामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली होती. मनसे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी फिरकलेदेखील नाही. भाजपाच्या मोरे विजयीप्रभाग ३६ (ब)च्या मतमोजणीमध्ये पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये शिवसेनेच सुनील शेलार व कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे शशिकांत उन्हवणे यांच्यात थोड्याफार मतांचा फरक होता. तर मनसेचे प्रवीण पवार हे तृतीय व भाजपाच्या सुनंदा मोरे यांना चतुर्थ क्रमांकाचे मतदान होते. मात्र नेहरूनगर मनपा शाळा येथे तीनही खोल्यांमध्ये जवळपास झालेले दोन हजार मतांची मोजणी होणे बाकी होते.