शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात मनसेची भाजपाला टाळी?

By admin | Updated: March 7, 2017 02:24 IST

नाशिक : मुंबईत शिवसेनेला हात पुढे करूनही टाळी न मिळालेल्या मनसेने नाशिकमध्ये बहुमतात असलेल्या भाजपाला टाळी देण्याची तयारी केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नाशिक : मुंबईत शिवसेनेला हात पुढे करूनही टाळी न मिळालेल्या मनसेने नाशिकमध्ये बहुमतात असलेल्या भाजपाला टाळी देण्याची तयारी केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे बळ वाढणार आहेच, शिवाय काही अपक्षही सहयोगी सदस्यत्व स्वीकारत सत्ताधारी बाकावर बसण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिकेत सत्तापदांच्या स्पर्धेत मनसेची किंगमेकर होण्याची संधी भाजपाच्या पवित्र्यामुळे हुकली. निवडणुकीत भुईसपाट झालेल्या मनसेला संजीवनी बुटीची गरज निर्माण झाली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेचे अवघे ५ नगरसेवक निवडून आले आहेत. पूर्ण बहुमत प्राप्त केले असल्याने अपक्षांसह अन्य पक्षांचाही पाठिंबा घेण्याची कसरत भाजपाला करावी लागणार नाही. याऊलट, सत्ताधारी असलेल्या भाजपासोबत राहण्यातच आपले हित आहे, याची जाणीव मनसेसह काही अपक्षांना झाली आहे. त्यामुळेच, नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपाला मनसेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी मनसेची सत्ता येण्यासाठी भाजपानेच साथ दिली होती. पहिली अडीच वर्षे भाजपा मनसेसोबत सत्तेत होती. सतीश कुलकर्णी यांनी उपमहापौरपद भूषविले होते. पाच वर्षांपूर्वी मनसेला भाजपाने केलेल्या मदतीतून उतराई होण्याची हीच वेळ असल्याचे मनसेतील नेत्यांचे म्हणणे आहे.याशिवाय, पाच वर्षे विरोधात बसण्यापेक्षा सत्ताधारी पक्षासोबत राहून आपली कामे करून घेणे अधिक हिताचे ठरेल, अशीही प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. त्यामुळे येत्या महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांसाठी मनसेच्या पाचही सदस्यांचे बोटवर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याबाबतचा निर्णय राज ठाकरे लवकरच जाहीर करतील, असेही सांगितले जात आहे. मनसेला भाजपाने टाळी दिल्यास प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेची कोंडी केली जाण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. दरम्यान, महापालिकेत तीन अपक्ष नगरसेवक निवडून आले असून, त्यातील एकजण भाजपाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारून पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.