शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या कार्यकर्त्यांना रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 19:04 IST

सिन्नर: अयोध्या येथे ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजनाच्या सभारंभाप्रसंगी सिन्नर येथे रामरक्षास्त्रोत्र व महाआरती करण्याचे नियोजन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केले होते. मात्र या कार्यक्रमासाठी परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी चौकातून आणून तीन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. राम मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम आटोपल्यानंतर या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.

ठळक मुद्देराम मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम आटोपल्यानंतर या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.

सिन्नर: अयोध्या येथे ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजनाच्या सभारंभाप्रसंगी सिन्नर येथे रामरक्षास्त्रोत्र व महाआरती करण्याचे नियोजन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केले होते. मात्र या कार्यक्रमासाठी परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी चौकातून आणून तीन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. राम मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम आटोपल्यानंतर या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, सरचिटणीस किशोर देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली सीताराम मंदिरात रामरक्षास्त्रोत्र व महाआरतीचे नियोजन करण्यात आले होत. त्याची परवानगी मागिण्यात आली होती. मात्र सदर मंदिर बंद असल्याने परवानगी नाकारण्यात आली होती.बुधवारी दुपारी बारा वाजता हांडे, शिंदे, देशमुख यांच्यासह शहराध्यक्ष सोनल लहामगे, रवी नाठे, छबू कांगणे, नितीन सरोदे, हितेश वर्मा, सचिन गोळेसर यांच्यासह र्कायकर्ता शिवाजी चौकात जमा झाले. सीताराम मंदिराला कुलूप असल्याने व मंदिराजवळ पोलीस बंदोबस्त असल्याने या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात येऊन सोशल डिस्टींगसिंग पाळत आरती करण्याचा प्रयत्न केला. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. रसेडे यांनी हांडे, देशमुख व शिंदे यांना पोलीस गाडी घेऊन ठाण्यात नेले. त्यानंतर उर्वरित कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले. सुमारे तीन तास या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बसविण्यात आल्यानंतर व भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी सोडून दिले. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याTempleमंदिर