शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मशीनमध्ये गडबड झाल्यास भाजपाचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:02 IST

गुजरातमधील निवडणूक ही तेथील जनता आणि मोदी यांच्यातच असून, यामध्ये तेथील जनतेचा विजय निश्चित आहे. मात्र वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला विजय मिळेल, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांनी केले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनविकासाचा खरा चेहरा समोर आला आहेव्यापारीही मोदी धोरणाच्या विरोधात

नाशिक : गुजरातमधील निवडणूक ही तेथील जनता आणि मोदी यांच्यातच असून, यामध्ये तेथील जनतेचा विजय निश्चित आहे. मात्र वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला विजय मिळेल, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांनी केले.  नाशिक शहर कॉँग्रेस कमिटी येथे संविधान दिनानिमित्ताने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांच्या हस्ते झाले यावेळी ते पत्रकार परिदेत बोलत होते. नरेंद्र मोंदी यांनी २०१४ची निवडणूक ही गुजरातमधील विकासाच्या मुद्द्यावर लढविली होती. आता तेथील विकासाचा खरा चेहरा समोर आला आहे. गुजरातमधील शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार झाले आहेत तर व्यापारीही मोदी धोरणाच्या विरोधात आहेत. येथील व्यापारी ‘एकही भूल कमल का फूल’ असे बिलांवर लिहित आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे येथील जनतेमध्ये मोदीच्या विरोधात असलेली भावना पाहता गुजरातच्या जनतेचाच विजय होईल, असे वाटते. भाजपा ज्या पद्धतीने निवडणुका जिंकत आहे त्याप्रमाणे जर वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला गुतरातमध्ये विजय मिळेल, असेही मोहनप्रकाश म्हणाले.  आजवर झालेल्या निवडणुकांनंतर अनेक पक्ष आणि व्यक्तींनी वोटिंग मशीनमधील गडबडीवर आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेशमधील राज्य निवडणूक आयोगाच्या महिला अधिकाºयानेच वोटिंग मशीनमधील गैरप्रकार उघड करून दाखविला आहे. वोटिंग मशीनमधील झोल हा तक्रारीनंतर लगेचच सिद्ध होईल, असेही नाही. त्यामुळे तत्काळ मशीनवर आक्षेप घेतला तरी त्याचा उपयोग होत नाही. परंतु जर या यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह असेल तर मग बॅलेटनुसार मतदानयंत्रणा राबविली पाहिजे, अशी मागणी अनेकदा अनेकांनी केल्याचे मोहनप्रकाश म्हणाले. लोकशाहीत जर अशाप्रकारचा आक्षेप वारंवार घेतला जात असेल तर केंद्राने पारदर्शकता आणली पाहिजे, असे ते म्हणाले.  दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पांढरी टोपी आणि खादी परिधान करणाºयांचा समावेश होता, तर काळी टोपी घालणारे आरएसएसवाले कधीही स्वातंत्र्याच्या बाजूने नव्हते, तर त्यांची इंग्रजांशी जवळीत होती, असा आरोपही मोहनप्रकाश यांनी केला. संपूर्ण देश भारत छोडोच्या आंदोलनात असताना आरएसएस मात्र इंग्रजांबरोबर होती, असेही ते म्हणाले.राम मंदिर निवडणुकीचाच मुद्दागुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएसने पुन्हा एकदा राम मंदिर निर्माण मुद्दा पुढे केला आहे. भाजपाचा मुद्दा देशासाठी काही नवीन नाही. कोणतीही निवडणूक आली की भाजपा-आरएसएस राम मंदिराचा मुद्दा पुढे करतात. गुजरात निवडणुकीतही भाजपाकडून विकासाचा नाही तर मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेस