शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसमोर ठाकणार महाआघाडीचे आव्हान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:19 IST

राज्यात शिवसेना- कॉँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवर राबविला जाण्याची चिन्हे असून, त्यात माजी आमदार रामदास चारोस्कर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास भाजपला मात्र मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देकोंडीत पकडण्याची शक्यता : चारोस्कर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार

भगवान गायकवाड ।दिंडोरी : राज्यात शिवसेना- कॉँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवर राबविला जाण्याची चिन्हे असून, त्यात माजी आमदार रामदास चारोस्कर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास भाजपला मात्र मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.दिंडोरी नगरपंचायतीमध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसोबत शिवसेना व एक अपक्ष नगरसेवक आहे, तर भाजपने स्वतंत्र गट केला असून, त्यात तीन अपक्ष व कॉँग्रेस, भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी एक नगरसेवक या विरोधी गटात आहे. पहिले दोन वर्षे कॉँग्रेसचे भाऊसाहेब बोरस्ते नगराध्यक्ष होते व राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष सचिन देशमुख होते. सहा महिने विरोधी गटाचे प्रमोद देशमुख व आशाताई कराटे यांना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. सध्या राष्ट्रवादीच्या रचना जाधव नगराध्यक्ष व कैलास मवाळ उपनगराध्यक्ष आहेत. गेल्यावेळी कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत कॉँग्रेसने जास्त जागा लढवल्या होत्या. मात्र त्यावेळी चारोस्कर कॉँग्रेसमध्ये होते. आता ते शिवसेनेत असल्याने कॉँग्रेसचा वाटा सेनेला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व व चारोस्कर यांच्यात दिलजमाई होण्यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे. अन्यथा खेडगाव जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत झालेला तालुका विकास आघाडीचा प्रयोग आगामी नगरपंचायत निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्यावेळी भाजप व शिवसेना दोघेही स्वतंत्र लढले व त्याचा फटका दोघांनाही बसला. भाजपला अवघी एकच जागा मिळवता आली, मात्र राज्यात भाजपचे सरकार असताना अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत येथे भाजपने आपली संख्या वाढवली असून, भाजप या निवडणुकीत टक्कर देण्यासाठी सज्ज राहणार आहे. मात्र ऐनवेळी काही समीकरणे जुळून आल्यास पुन्हा शहर विकास आघाडीचा प्रयोग राबविला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.अद्याप नियोजनात्मक विकासाच्या प्रतीक्षेतदिंडोरी शहरात नगरपंचायत झाल्याने शहराचा वेगाने विकास होईल अशा अपेक्षा होत्या. त्यादृष्टीने काही विकासकामे मंजूर होत ते सुरूही झाले; पण त्यात नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून येत आहे. शहरात भुयारी गटारी सर्वत्र झाल्या, मात्र त्या करत असताना रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. सर्व उपनगरांमध्ये रस्त्यांची समस्या बिकट आहे. मुख्य रस्त्यावरील दुकाने हटवली. परंतु जागेवर अवास्तव पार्किंग होत वाहतूक कोंडी कायम आहे. शहरात पार्किंगची समस्या जटिल आहे. शहरात विकासाच्या विविध योजना मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा कायम आहे.

टॅग्स :Politicsराजकारण