शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सहकारात भाजपाची मुसंडी, मात्र गटातटात अडकली गाडी

By admin | Updated: May 22, 2015 01:32 IST

सहकारात भाजपाची मुसंडी, मात्र गटातटात अडकली गाडी

गणेश धुरीनाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कधी नव्हे ते भाजपाचे अर्धा डझनभर आजी-माजी आमदार व खासदार निवडून आले. मात्र बॅँकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या पॅनलरूपी गटातटात अडकल्याने भाजपाला सहकारात ‘अच्छे दिन’ येऊनही आता बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी हायकमांडच्या कोर्टात चेंडू टोलवावा लागणार आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजपावासी झालेले आमदार अपूर्व हिरे व अद्वय हिरे यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलची निर्मिती केली होती. त्यांच्या पॅनलला आमदार अपूर्व हिरे व कॉँग्रेसच्या माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या रूपाने दोनच जागांवर समाधान मानावे लागले, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे व माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या शेतकरी विकास पॅनलकडून भाजपा आमदार सीमा हिरे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडून आले. तसेच तालुका गटातून माजी आमदार माणिकराव कोकाटे व जि. प. सभापती केदा अहेर निवडून आले आहेत, तर क वर्गासाठी झालेल्या निवडणुकीत मनसेचे दिवंगत नेते उत्तमराव ढिकले यांचे चिरंजीव डॉ. सुनील ढिकले यांचा आमदार अपूर्व हिरे यांनी ६३ मतांनी पराभव केला. जिल्हा बॅँकेच्या एकूण २१ संचालकांमध्ये भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आ. अपूर्व हिरे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, अद्वय हिरे व जि. प. सभापती केदा अहेर, असे सहा संचालक निवडून आले आहेत. भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार वसंत गिते यांचा शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी आश्चर्यकारक पराभव केला. राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप बनकर तसेच माजी संचालक परवेज कोकणी, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, गणपतराव पाटील, धनंजय पवार, सचिन सावंत, शिवाजी चुंबळे या आठ उमेदवारांनी विजय मिळविला असला तरी त्यातील दराडे बंधू हे पिंगळे-कोकाटे गटाकडे, तर चुंबळे हे ढिकले गटाकडे असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत माजी संचालक व माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यासह राजेंद्र भोसले, माजी आमदार वसंत गिते व अ‍ॅड. अनिल अहेर ही चौकडी पराभूत झाली, तर आमदार अनिल कदम, आमदार सीमा हिरे, आमदार अपूर्व हिरे, केदा अहेर, सचिन सावंत, किशोर दराडे, सचिन सावंत, सुहास कांदे, शिवाजी चुंबळे, नामदेव हलकंदर हे पहिल्यांदाच जिल्हा बॅँकेची पायरी चढणार आहेत. भाजपाला पहिल्यांदाच जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पद मिळविण्याची संधी असली तरी अंतर्गत गटबाजीतून ही दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात. सेनेच्या आमदार अनिल कदम व सुहास कांदे यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत.