नांदगाव : भाजपाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची व वर्षानुवर्षे पक्षात राहून काम करणाऱ्या इच्छुकांची संख्या लक्षात घेता भाजपाने यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर लढावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती वेळी पक्षश्रेष्ठींकडे धरला. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी माजी नगरसेवक राजाभाऊ धामणे, उमेश उगले, वैशाली दुसाने यांनी भाजपाकडे आपले अर्ज दाखल केले, तर माजी नगरसेवक विलासराव देशमुख यांच्या पत्नी शुभांगी देशमुख आज आपला अर्ज दाखल करणार आहेत.येथील ज्ञानेश्वर माउली मंदिरात भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, जिल्हा सरचिटणीस बापूसाहेब पाटील, भावराव निकम, पक्षाच्या कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पवार, तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, पक्षाच्या अनुसूचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बनकर, शहर अध्यक्ष उमेश उगले आदिंच्या उपस्थितीत संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या निवडणूक विभागाचे प्रभारी यांनी कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली व मुलाखती घेतल्या. नांदगाव पालिकेच्या आठही प्रभागातील एकूण सतरा जागांवर भाजपाकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती हे बैठकीतले वैशिष्ट्ये ठरले. बैठकीला बळीराम निकम, हणमंत सानप, संजय पटेल, संजय पगारे, सुरेश शेळके, राहुल अहिरे, स्वप्नील शिंदे, गणेश शिंदे, दिनेश दिंडे, नितीन जोशी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
भाजपाने स्वबळावर लढावे
By admin | Updated: October 22, 2016 01:00 IST