शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

सोयीच्या भूमिकेनेच भाजपाला दणका

By admin | Updated: July 5, 2014 00:16 IST

सोयीच्या भूमिकेनेच भाजपाला दणका

नाशिक : मोलाचे स्थायी समिती सभापतिपद मिळाले नाही म्हणून आदळआपट करणाऱ्या भाजपाच्या शहराध्यक्षांनी थेट मनसेशी युती तोडण्याची भाषा सुरू केली आहे. तथापि, आतून एक आणि बाहेरून दुसरी भूमिका घेणाऱ्या भाजपाला हा दणका मिळणे स्वाभाविकच होते. त्यामुळे आता मनसेला इशारे देण्याच्या माध्यमातून भाजपा आपली नाचक्की मात्र करून घेत आहे.राजकारणात कोणी कोणाचा फार काळ मित्र नसतो आणि शत्रूही नसतो. तथापि, शिस्त आणि वैचारिकता या विषयावर आपल्याच पक्षाचे स्वामित्व हक्क आहेत असे मानणाऱ्या भाजपाने अशा अनेक तडजोडी महापालिकेत केल्या आहेत. त्यामुळे सेनेबरोबर सत्तेची लागलेली गोडी कायम ठेवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मनसेशी घरोबा केला. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाची महायुती दोन तपांपासून आहे; परंतु पालिकेच्या निवडणुकीत सेनेचे अवघे २२ नगरसेवक निवडून आले आणि त्यांना सत्ता मिळत नाही हे दिसू लागल्यानंतर भाजपाने लगेचच कोलांटउडी घेतली आणि सत्तेजवळ जाऊ पाहणाऱ्या मनसेशी घरोबा केला. मनसेचे सर्वाधिक म्हणजेच चाळीस नगरसेवक निवडून आले असल्याने जनाधार त्यांच्या बाजूने आहे, त्यामुळेच जनाधाराला साथ दिली अशी गोंडस भूमिका भाजपाचे शहराध्यक्ष असलेल्या लक्ष्मण सावजी यांनी मांडली होती. त्यावेळी शिवसेनेने बरीच टीका केली; परंतु तेव्हा मनसे या नव्या पक्षाला भवितव्य असल्याचा साक्षात्कार भाजपाला झाला होता. महापालिकेत मनसेबरोबर आणि बाहेर मनसेचा स्पर्धक असलेल्या शिवसेनेबरोबर युती कायम ठेवून आपण राजकारणातील चाणक्य कसे आहोत असेच भाजपाचे हे मुखंड दाखवित होते. एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचा प्रयत्न अखेर भाजपाच्या कधी ना कधी अंगलट येणार होताच आणि झालेही तसेच. स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेने सभापतिपद देण्यास नकार तर दिलाच; परंतु साम, दाम, दंड, भेद, नीतीचा वापर करून सभापतिपद पटकावले. भाजपाने ऐनवेळी सेनेची मदत घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी ठरला. त्यामुळे भाजपाने संतापात अधिकच थयथयाट करून यापुढे आम्हाला कोणत्याच निवडणुकीत गृहीत धरू नका असा इशाराही द्यायला सुरुवात केली आहे.इतकेच नव्हे तर मनसेने आता जनाधार गमावल्याचा साक्षात्कारही भाजपाला झाला आहे. आधी सेनेशी दगा आणि मनसेशी दोस्ती, मग मनसेला दगा आणि सेनेशी हातमिळवणी, अशी सोयीची भूमिका घेणाऱ्या शहराध्यक्षांमुळेच भाजपाला नामुष्की पत्करावी लागली आहे, हे त्यांना मान्य करण्यावाचून पर्याय तरी काय? (प्रतिनिधी)