शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सेनेला टक्कर देण्यासाठी भाजपा, मनसेची रणनीती

By admin | Updated: January 13, 2017 01:07 IST

प्रभाग २५ : तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न; सर्वांचे लक्ष लागून

नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोसलग दहा वर्षांपासून सेनेचे प्राबल्य असलेल्या सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये सेनेला शह देण्यासाठी मनसे, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच पक्ष सेनेच्या उमेदवारांसमोर ताकदवान उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करीत असून, याबाबत भाजपा व मनसे काय रणनीती आखणार आहे.गेल्या वीस वर्षांपूर्वी सावतानगर, पाटीलनगर, मोती चौकासह येथील परिसरात कॉँग्रेसचे वर्चस्व होते. यानंतर मात्र गेल्या दहा वर्षांपासून सेनेने या ठिकाणी वर्चस्व निर्माण केले असल्याचे दिसत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे मनसेलाही जनतेने कौल दिल्याने सिडको भागात २२ पैकी तब्बल सात उमेदवार निवडून आले. परंतु अलीकडच्या काळात मनसेवर नाराज असलेले अनेक नगरसेवक हे मनसेतून इतर पक्षांत गेल्याने मनसेच्या उमेदवारावांची संख्या कमी झाली आहे. या प्रभागातून मनसेचे दोन विद्यमान नगरसेवक निवडणूक लढविणार असल्याने मनसेसाठीदेखील ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. या प्रभागातून शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, विभागप्रमुख किरण शिंदे, महिला आघाडीच्या संघटक शोभा गटकळ, माजी नगरसेवक शोभा निकम, श्यामकुमार साबळे, पवन मटाले,अभय पवार आदि इच्छुक आहेत, तर मनसेकडून विद्यमान नगरसेवक अनिल मटाले, कांचन पाटील, अ‍ॅड. अतुल सानप, सचिन रोजेकर यांच्या आई सावित्री रोजेकर, तर भाजपाकडून मंडल उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश अमृतकर, मुरलीधर भामरे, मंडल अध्यक्ष गिरीश भदाणे यांच्या पत्नी वैशाली भदाणे, भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष राकेश ढोमसे यांच्या पत्नी भाग्यश्री ढोमसे, युवा मोर्चा कोषाध्यक्ष केतन अवसकर यांच्या पत्नी आसावरी अवसरकर, गणेश अरिंगळे, संगीता पाटील, मनोज बिरार, आशिष हिरे आदि इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून अमोल नाईक, विजय मटाले, मुकेश शेवाळे आदि इच्छुक आहेत. कॉँग्रेसकडून माजी नगरसेवक अण्णा पाटील यांचे चिरंजीव भरत पाटील व अपक्ष म्हणून तुषार साळुंके इच्छुक आहेत.