शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी भाजपामध्ये रस्सीखेच नगरपालिका निवडणुकांच्या भवितव्यावर उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:24 IST

नाशिक : येत्या जून २०१८ मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र तूर्तास इगतपुरी व त्र्यंबकेश्वर पालिकांच्या निवडणूक निकाला वरच काही संभाव्य उमेदवारांचे भवितव्य अवलंबूून असल्याची चर्चा आहे. 

ठळक मुद्देविधान परिषदेसाठी भाजपामध्ये रस्सीखेच इगतपुरी व त्र्यंबकेश्वर पालिकांच्या निवडणूक निकाला वरच काही संभाव्य उमेदवारांचे भवितव्य अवलंबूून

नाशिक : येत्या जून २०१८ मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र तूर्तास इगतपुरी व त्र्यंबकेश्वर पालिकांच्या निवडणूक निकाला वरच काही संभाव्य उमेदवारांचे भवितव्य अवलंबूून असल्याची चर्चा आहे.  शिवसेनेने तर आतापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे शिवाजी सहाणे की नरेंद्र दराडे या नावांवर पडदा टाकून नरेंद्र दराडे यांनाच पुढे चाल दिल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे, तर राष्टÑवादी कॉँग्रेसकडून या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार जयंत जाधव इच्छुक नसल्याचे सांगितले जात असले, तरी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ बाहेर आल्यानंतर त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तूर्तास राष्टÑवादीकडून आजमितीस माजी खासदार देवीदास पिंगळे व माजी आमदार दिलीप बनकर या दोघांच्याच नावांची चर्चा आहे. भाजपाने मात्र या सर्व बाबतीत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका स्वीकारली आहे. इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल व नगरसेवक सचिन ठाकरे यांच्यावर, तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार वसंत गिते व आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते. तसेच भाजपात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या एका राष्टÑवादीच्या नेत्यावरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदारी सोपविण्यात आल्याचे कळते. विधान परिषदेसाठी भाजपाकडून केदा अहेर, सुनील बागुल, वसंत गिते आदी इच्छुक आहेत.काही दिवसांपूर्वीच भाजपा कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतलेले जिल्हा बॅँकेचे संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे हेही भाजपाकडून विधान परिषदेसाठी नशीब आजमावू शकतात. त्यामुळेच त्यांनी इगतपुरी नगरपालिका निवडणुकांची चर्चा त्यावेळी पालकमंत्र्यांशी केल्याचे समजते. एकूणच भाजपाकडून विधान परिषदेची निवडणूक लढविण्याच्या जय्यत तयारीत असल्याचे चित्र आहे. मात्र शिवसेनेने प्रसाद लाड यांना विधान परिषदेसाठी पाठिंबा दिलेला असल्याने त्या बदल्यात नाशिकला शिवसेना भाजपाकडून पाठिंबा घेण्याच्या तयारीत आहे.राष्ट्रवादीचे पदाधिकारीही इच्छुकभाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळविण्यासाठी त्र्यंबकेश्वरची जबाबदारी असलेले राष्ट्रवादीचे एक पदाधिकारीही इच्छुक असल्याचे कळते. मात्र या निवडणूक निकालांच्या जय-पराजयाच्या निर्णयानंतरच इच्छुकांची उमेदवारी निश्चिती होण्याची चिन्हे आहेत.