शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे नेते व मंत्री गिरीश बापट म्हणतात, राज ठाकरे यांचा घेतो सल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 15:58 IST

नाशकात दोघांची भेट : उभयतांमध्ये दहा मिनिटे चर्चा

ठळक मुद्देराज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि गिरीष बापट यांनी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाजूला जात सुमारे दहा मिनिटे केली चर्चा पुण्यातीलही मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची विनंती

नाशिक - एरव्ही भाजपा आणि मोदी सरकारवर सडकून टीका करणारे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी भेट घेतली आणि उभयतांमध्ये उभ्यानेच दहा मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर, गिरीश बापट यांनी आपली राज यांचेशी ३५ वर्षांपासूनची मैत्री असून त्यांचा मी सल्ला घेत असतो, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.मनसे प्रमुख राज ठाकरे हे गुरुवार (दि.९) पासून नाशिक दौऱ्यावर आहेत. राज यांचा गोल्फ क्लबवरील शासकीय विश्रामगृहात मुक्काम होता. राज यांच्याच दालनाजवळ भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट हे सुद्धा सुनावणीच्या कामांसाठी आलेले होते. सकाळी राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन करण्यासाठी निघाले असताना समोरुन गिरीश बापट यांची स्वारी अवतरली आणि दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन करत ख्यालीखुशाली विचारली. त्यानंतर, राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि गिरीष बापट यांनी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाजूला जात सुमारे दहा मिनिटे चर्चा केली. त्यानंतर, पत्रकारांनी गिरीश बापट यांना विचारले असता, बापट यांनी सांगितले, राज यांचेशी माझी गेल्या ३५ वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांचा सल्ला मी घेत असतो. मनसेने फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनात पुण्यातीलही मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसात गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर गुन्हे मागे घेण्याची विनंती बाळा नांदगावकर यांनी केली. परंतु, गुन्हे मागे घेण्याचे काम सरकारचे नाही. सदर प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. सरकारकडे जर गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव आला तर त्यासाठी एक समिती आहे आणि या समितीवर मी सुद्धा सदस्य आहे. परंतु, न्यायप्रवीष्ट बाबीवर अधिक बोलणे योग्य होणार नाही, असे सांगत बापट यांनी याव्यतिरिक्त कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. राज आणि बापट यांच्यातील भेटीची चर्चा नंतर मात्र उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNashikनाशिक