कळवण : आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन कळवण तालुका भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आगारप्रमुख हेमंत पगार यांना देण्यात आले.२९ जानेवारी रोजी देवळा - सौंदाणे रोडवर मेशी फाट्यावर कळवण आगाराच्या बसला मोठा अपघात झाला होता. या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कळवण आगारात असलेल्या जुन्या बसेस कायमच्या बंद कराव्यात, नवीन बसेस द्याव्यात, चालक-वाहक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची वर्षातून किमान एकवेळा आरोग्य तपासणी करण्यात यावी, तसेच अपघातात मृत पावलेल्या बसमधील प्रवासी व खासगी अॅपेरिक्षातील प्रवाशांना भरीव मदत १५ दिवसात देण्यात यावी. मृतांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशा विविध मागण्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
भाजपतर्फे विविध मागण्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:14 IST