शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चारही जागांवर भाजपाचा दावा

By admin | Updated: August 8, 2014 00:56 IST

चारही जागांवर भाजपाचा दावा

 

नाशिक : शिवसेना-भाजपाची युती होणार की नाही याबाबत निर्णय झालेला नसला, तरी नाशिक शहरातील चारही जागा भारतीय जनता पार्टीनेच लढवाव्यात, अशी आग्रही मागणी भाजपाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी केली. शहराच्या चारही मतदारसंघांतून किमान दोन डझन उमेदवारांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या.भाजपाच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक निरीक्षक आमदार चंद्रकांत पाटील व आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत शुभमंगल कार्यालयात झाली. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, प्रदेश सरचिटणीस सीमा हिरे, सुहास फरांदे, माजी शहराध्यक्ष विजय साने, भाजयुमोर्चा शहराध्यक्ष गिरीश पालवे, उपमहापौर सतीश कुलकर्णी, आमदार अपूर्व हिरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शहरातील पदाधिकाऱ्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जास्त मतदारसंघ मिळण्याची आशा कमी असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात इगतपुरी व सिन्नर विधानसभा मतदारसंघात फारशी संधी नसल्याने शहरातील पूर्व, मध्य, पश्चिम व देवळाली हे चारही विधानसभा मतदारसंघ भाजपानेच लढवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पूर्वसाठी सहा, पश्चिमसाठी आठ, मध्यसाठी तीन, तर देवळालीसाठी पाच अशा संख्येने इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यावेळी माजी महापौर बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, कमलेश बोडके, दामोदर मानकर, जगन पाटील, सुरेश पाटील, सुनील केदार, कुणाल वाघ, कुणाल गायकवाड, प्रशांत भदाणे, प्रशांत जाधव, अजित ताडगे, नाना शिलेदार, सुजाता करजगीकर, भारती बागुल, गणेश कांबळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)