शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजप मंडल अध्यक्षांच्या निवडणुकींना अखेर प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:54 IST

विधानसभा निवडणूका संपताच भाजपने संघटनात्मक निवडणूका जाहीर केल्या होत्या. १० डिसेंबरपर्यंत राज्यात सर्व संघटनात्मक निवडणुका घेण्याचे जाहिर करण्यात आले होते.

नाशिक : विधानसभा निवडणूका संपताच भाजपने संघटनात्मक निवडणूका जाहीर केल्या होत्या. १० डिसेंबरपर्यंत राज्यात सर्व संघटनात्मक निवडणुका घेण्याचे जाहिर करण्यात आले होते. मात्र, संघटनात्मक निवडणुकांमधील अडचणींमुळे वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. नाशिकमध्ये बुथप्रमुख आणि मंडल अध्यक्षांची निवडणूक रखडल्याने शहराध्यक्षपदाची निवडणूक रखडली होती. मात्र, त्यानंतर पक्षाने जळगाव येथे झालेल्या पक्ष बैठकीनंतर मंडलाची पुनर्रचना केली असून, आता एकूण दहा मंडल तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार पश्चिम नाशिक मतदारसंघात पूर्वी सिडको आणि सातपूर अशी दोनच मंडले होते. त्याठिकाणी सिडको एक, सिडको दोन आणि सातपूर असे तीन मंडल तयार करण्यात आले असून, मध्य नाशिक मतदारसंघात मध्य आणि द्वारका असे दोन मंडल होते. त्यात आता द्वारका, जुने नाशिक तसेच मध्य मंडल असे तीन मंडल करण्यात आले आहेत, तर पूर्व नाशिकमध्ये पंचवटी एकच मंडल होते त्याला आता पंचवटी, तपोवन आणि नाशिकरोड असे तीन मंडल करण्यात आले आहेत. याशिवाय नाशिकरोड आणि देवळाली या दोन मंडलदेखील शहरात समावून घेण्यात आले आहेत.या पुनर्रचनेनंतर शनिवारपासून मंडल अध्यक्षांच्या निवडीला प्रारंभ झाला आहे. निवडणूक अधिकारी रामहरी संभेराव, शरद मोरे आणि सहायक निवडणूक अधिकारी सुजाता करजगीकर, भारती बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत द्वारका, जुने नाशिक व मध्य मंडलांमध्ये अध्यक्षपदी सुनील देसाई, भास्कर घोडेकर व देवदत्त जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.यानंतर उपस्थितांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, वसंत गिते, सुनील बागुल, प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते विजय साने, सतीश बापू सोनवणे आदी उपस्थित होते.इच्छुकांच्या हालचाली गतिमानभाजपच्या संघटनात्मक निवडणुकींना प्रारंभ झाल्याने शहर जिल्हाध्यक्षपदासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. विद्यमान शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्याबरोबरच अध्यक्षपदासाठी सुनील केदार, उत्तमराव उगले, प्रशांत जाधव, नाना शिलेदार, अशिश नहार, अनिल भालेराव यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाने तरूण आणि नव्या चेहेºयावर भर दिल्याने प्रस्थापित नेते मात्र स्पर्धेतून बाद झाले आहेत.तीन जानेवारीला निवड होणारगेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या भाजपच्या संघटनात्मक निवडणुकींना अखेर प्रारंभ झाला असून, शनिवारी (दि.२८) तीन मंडलाच्या निवडणुकांचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले. यात द्वारका, जुने नाशिक व मध्य मंडलांमध्ये अध्यक्षपदी सुनील देसाई, भास्कर घोडेकर व देवदत्त जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत नऊ मंडलांच्या निवडणुका पार पाडण्यात येणार असून, ३ जानेवारीच्या आत नूतन शहराध्यक्षांची निवड होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा