शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बरखास्तीच्या भीतीने सर्वपक्षीयांची एकजूटजिल्हा बॅँकेत भाजपा-सेना साथ साथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:43 IST

नाशिक : विविध चौकश्या व गैरव्यवहारांच्या तक्रारीवरून बरखास्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत केदा अहेर यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे सत्ताधारी भाजपा व शिवसेना यांची साथ साथ वाटचाल सुरू झाली आहे. अध्यक्षपद भाजपाकडे व उपाध्यक्षपद सेनेकडे असल्यामुळे नजीकच्या काळात दोन्ही पक्षाच्या ताब्यात बॅँक राहणार असल्याने बॅँकेवर सहकार विभागाकडून केल्या जाणाºया संभाव्य कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसे असले तरी, केदा अहेर यांची बिनविरोध निवड करून सर्वपक्षीय संचालकांनी बॅँकेचे भवितव्य लक्षात घेता एकजूट दाखविण्याचे औदार्य दाखविले आहे.

ठळक मुद्देबरखास्तीच्या भीतीने सर्वपक्षीयांची एकजूटजिल्हा बॅँकेत भाजपा-सेना साथ साथ !

नाशिक : विविध चौकश्या व गैरव्यवहारांच्या तक्रारीवरून बरखास्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत केदा अहेर यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे सत्ताधारी भाजपा व शिवसेना यांची साथ साथ वाटचाल सुरू झाली आहे. अध्यक्षपद भाजपाकडे व उपाध्यक्षपद सेनेकडे असल्यामुळे नजीकच्या काळात दोन्ही पक्षाच्या ताब्यात बॅँक राहणार असल्याने बॅँकेवर सहकार विभागाकडून केल्या जाणाºया संभाव्य कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसे असले तरी, केदा अहेर यांची बिनविरोध निवड करून सर्वपक्षीय संचालकांनी बॅँकेचे भवितव्य लक्षात घेता एकजूट दाखविण्याचे औदार्य दाखविलेआहे.जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी भाजपाने सुरुवातीपासूनच दावेदारी करण्यास सुरुवात केली असली तरी, त्याला बळ देण्याचे काम मूळ राष्टÑवादीचे परवेज कोकणी यांनी केले. त्र्यंबक नगरपालिका निवडणुकीपासून भाजपाशी त्यांची वाढलेली जवळिकता जिल्हा बॅँकेत भाजपाला उभारी देणारे होते, अशातच त्र्यंबक नगरपालिका भाजपाच्या ताब्यात आल्यामुळे तर भाजपानेही कोकणी यांना पदरात घेतले होते. खुद्द मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांच्या पुढ्यात कोकणी यांचे प्रदर्शन करण्यात आमदार बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेतला, अर्थात हे करत असताना सानप यांनी कोकणी यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून पक्षांतर्गत विरोधकांना धक्का देण्याचे साधून घेतले. त्यामुळे जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपदी कोकणी यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. त्यांच्या पाठीशी जवळपास दहा ते बारा संचालकांचे बळदेखील होते, या बळात कॉँग्रेस व राष्टÑवादी समर्थक संचालकांचा समावेश होता. परंतु नेहमीच राजकारण करणाºयांना कोकणी यांची अध्यक्षपदी निवड होणे मानवणारे नव्हते, त्यामुळेच की काय अल्पसंख्याक व बहुसंख्याक असा वाद उभा करण्यात आला, त्याला जातीय जोड देण्याचाही प्रयत्न इच्छुकांनी करून पाहिला, परिणामी बहुसंख्याकांच्या नाराजीने जिल्हा बॅँकेची सत्ता भोगण्यास भाजपाला परवडली नसती. त्यामुळे एकमताने उमेदवाराचा पर्याय पुढे आला व केदा अहेर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यात कोकणी यांचा मनाचा मोठेपणा अधिक आहे. केदा अहेर यांच्यामुळे मूळ भाजपावासीयांच्या ताब्यात पहिल्यांदा जिल्हा बॅँकेची सूत्रे गेली आहेत. उपाध्यक्षपद सेनेकडे ठेवण्यात येणार असल्यामुळे सेनेने या बिनविरोध निवडणुकीस हातभार लावला आहे, त्यामुळे आगामी काळात भाजपा-सेनेची बॅँकेत वाटचाल कायम असेल. त्याला विरोधी पक्षाच्या संचालकांचा निश्चितच पाठिंबा राहील.