शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात मोकाट कुत्र्यांनी घेतला दोघांना चावा

By श्याम बागुल | Updated: September 6, 2018 15:30 IST

गेल्या काही दिवसांपासून इंदिरानगर परिसरात दहा ते पंधराच्या संख्येने मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून, पादचारी, वाहनचालकांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. महापालिकेची मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम थंडावल्याने त्यांचा सुळसुळाट झाला आहे

ठळक मुद्देनागरिक दहशतीखाली : बंदोबस्त करण्याची मागणी

नाशिक : उद्यम रायगड सोसायटी परिसरात बुधवारी सकाळी मोकाट कुत्र्यांनी दोन जणांना घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून, परिसरात मोकाट कुत्र्यांनी उपद्रव मांडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या एका लहान बालकाच्या अंगावर चार ते पाच कुत्र्यांनी धाव घेऊन त्याला चावा घेतला, ही घटना पाहणा-या नागरिकांनी कुत्र्यांना हुसकावले मात्र त्यानंतर थोड्या वेळातच आणखी थोडे पुढे एका इसमाच्या पायाला चावा घेऊन कुत्रे पसार झाले. लागोपाठच्या या घटनांनी परिसरात दहशत निर्माण झाली असून, गेल्या काही दिवसांपासून इंदिरानगर परिसरात दहा ते पंधराच्या संख्येने मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून, पादचारी, वाहनचालकांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. महापालिकेची मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम थंडावल्याने त्यांचा सुळसुळाट झाला आहे. श्रद्धाविहार कॉलनी, राजीवनगर झोपडपट्टी, जिल्हा परिषद कॉलनी, गजानन महाराज रस्ता, महारुद्र कॉलनी, कमोदनगर, शास्त्रीनगर, विनयनगर, साईनाथनगर, भारतनगर, शिवाजीवाडी, पांडवनगरी, मोदकेश्वर मंदिर परिसर आदी भागातील रहिवासी मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला वैतागले असून, त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.प्रशासनाला धारेवर धरून उपयोग नाहीपूर्ण प्रभाग समितीच्या सभेत मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम थंडावल्याने इंदिरानगर परिसरात त्यांचा उपद्रव वाढल्याबद्दल प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे व अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी प्रशासनास धारेवर धरले होते. परंतु तरीही महापालिकेने त्याची दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात असून, मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेचे वाहन आले असता, कुत्रे परिसरातून गायब होऊन जातात आणि वाहन गेल्यावर पुन्हा रस्त्यावर येतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.

 

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNashikनाशिक