शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अभूतपुर्व उत्साहात वडाळागावत प्रेषित मुहम्मद पैगंबरांचा जन्मोत्सव; सजावटीने नटलेल्या मार्गावरून मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 14:18 IST

सकाळी साडेदहा वाजता येथील मुख्या जामा गौसिया मशिदीपासून धर्मगुरू मौालाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूकीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला

ठळक मुद्देनारे तकबीर अल्लाहु अकबर’, ‘नारे रिसालत या रसुलअल्लाह’, ‘ईद-ए-मिलाद, जिंदाबाद’चा जयघोष भारताच्या प्रगतीसाठी व एकात्मतेच्या बळकटीकरीता सामुहिकरित्या प्रार्थना

नाशिक : ‘इस्लाम’चे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलाद शनिवारी (दि.२) सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वडाळागाव परिसरातूनही सकाळी अभूतपुर्व उत्साहात मिरवणूक (जुलूस-ए-मुहम्मदी) काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.पैगंबर जयंतीनिमित्त आठवडाभरापासून वडाळागाव परिसरात लगबग पहावयास मिळत होती. मिरवणूक मार्गावर सजावटीची तयारीसह मिरवणूकीचे नियोजन केले जात होते. विविध मंडळांकडून वडाळागावातील जामा गौसिया मशिदीपासून संपुर्ण मिरवणूक मार्गावर हिरवे झेंडे, आकर्षक स्वागत कमानी, विद्युत रोषणाई, पवित्र मक्का-मदिना शरीफचे फलकांची उभारणी करण्यात आली होती. तसेच पताका, रंगीबेरंगी फुगे, चमकी लावून परिसर सुशोभीत करण्यात आला होता.सकाळी साडेदहा वाजता येथील मुख्या जामा गौसिया मशिदीपासून धर्मगुरू मौालाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूकीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. ‘नारे तकबीर अल्लाहु अकबर’, ‘नारे रिसालत या रसुलअल्लाह’, ‘ईद-ए-मिलाद, जिंदाबाद’चा जयघोष करीत मिरवणूकीत सहभागी मंडळांचे कार्यकर्ते मार्गस्थ झाले. यावेळी सहभागी सर्व मंडळांकडून पैगंबर यांच्यावर आधारित स्तुतीकाव्य पठण केले जात होते. मिरवणूक गौसिया मशिद, केबीएच विद्यालयामार्गे, खंडेराव चौकातून जय मल्हार कॉलनी, अहमद रझा चौकातून गणेशनगर, सावता माळी कॅनॉल रस्त्याने तैबानगर, मदीनानगर सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधून मार्गस्थ होत गरीब नवाज कॉलनी, माळगल्लीमधून चांदशावली बाबा दर्गाच्या प्रारंगणात पोहचली. येथे मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. दरुदोसलाम व फातिहा पठणानंतर अन्नदानाचा नागरिकांनी लाभ घेतला. मिरवणूकीत मोठ्या संख्येने अबालवृध्द सहभागी झाले होते.

एकात्मता व देशाच्या प्रगतीसाठी दुवासमारोपप्रसंगी धर्मगुरू जुनेद आलम यांनी समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी मुहम्मद पैगंबर यांचा जीवनमार्ग अवलंबविण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी समाजबांधवांना पैगंबरांनी दिलेली मानवता, बंधुता, सदाचाराची शिकवण अंमलात आणावी असे आवाहन केले. यावेळी भारताच्या प्रगतीसाठी व एकात्मतेच्या बळकटीकरीता सामुहिकरित्या प्रार्थना करण्यात आली.---

टॅग्स :NashikनाशिकMuslimमुस्लीमIslamइस्लाम